Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षित अन् श्रीदेवींमध्ये होतं कट्टर वैर? 'कॅटफाईट'च्या चर्चांवर 'धकधक गर्ल' स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:43 IST

"त्या अशा लोकांपैकी एक होत्या ज्या...", श्रीदेवींसोबत कॅटफाईटच्या चर्चांवर माधुरी दीक्षित नेमकं काय म्हणाली?

Madhuri Dixit And Sridevi:बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल दररोज वेगवेगळ्या चर्चा कानावर येत असतात.हा सगळा गॉसिपिंगचा भाग असल्यामुळे त्यामध्ये किती तथ्य असतं, यातही शंका असतेच. अशाच अफवांमुळे अनेकदा सेलिब्रिटींना उलटसूलट प्रश्नांचा सामना करावा. ९० च्या दशकात  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्यातील कॅटफाईटची देखील फार चर्चा झाली होती. माधुरी- श्रीदेवी यांच्यात कट्टर वैर होतं, असंही म्हटलं जायचं. त्या चर्चांवर आता माधुरी दीक्षितने बऱ्याच वर्षानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 

९० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यातील माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी ही दोन आघाडीची नावे आहेत. एकेकाळी  बॉलिवूडमध्ये एकमेकींच्या कट्टर स्पर्धक म्हणून त्या टेचात वावरल्या. मात्र, त्यांच्याबाबतीत अनेक अफव्या पसरल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीने त्या अफवांचं खंडण केलं आहे. 'झुम' ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली," आमच्यात असं काहीही घडलं नव्हतं ज्यामुळे आम्ही एकमेकांचा अनादर करण्याचा काही प्रश्नच नव्हता.श्रीदेवी अशा लोकांपैकी एक होत्या ज्यांनी आयुष्यात खूप मेहनत केली आणि नाव कमावलं.मी सुद्धा तशीच आहे.हे आम्हा दोघींनाही चांगलंच माहित होतं." 

कलंक चित्रपटात माधुरी दीक्षितने श्रीदेवींना केलं रिप्लेस?

दरम्यान, करण जोहर दिग्दर्शित कलंक या चित्रपटात माधुरी दीक्षित नाहीतर श्रीदेवी पहिली पसंती होत्या. मात्र, दुर्दैवाने चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्यापूर्वी श्रीदेवीयांचं निधन झालं. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर, 'कलंक'चित्रपट अपूर्ण राहू नये म्हणून माधुरी दीक्षितला साईन करण्यात आलं. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने त्यावेळी सोशल मीडियावर माधुरीसाठी एक आभार संदेश पोस्ट केला होता, ज्यात तिने लिहिले होते की,'हा चित्रपट तिच्या आईसाठी खूप खास होता आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत, असं जान्हवीने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Madhuri Dixit clarifies rumors of rivalry with Sridevi after many years.

Web Summary : Madhuri Dixit addressed long-standing rumors of a feud with Sridevi, stating there was no animosity. She acknowledged Sridevi's hard work and talent. Madhuri replaced Sridevi in 'Kalank' after her death, a gesture appreciated by Janhvi Kapoor.
टॅग्स :माधुरी दिक्षितश्रीदेवीबॉलिवूडसेलिब्रिटी