Join us

अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम'मध्ये सौंदर्याच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री; का नाकारली ऑफर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:38 IST

'सूर्यवंशम'साठी सौंदर्या नाहीतर 'या' अभिनेत्रीला मिळालेली पहिल्यांदा ऑफर, पण... 

Soorywansham Movie:बॉलिवूड अभिनेत्री मधू (Madhoo) ही ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपला दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, मधुने अजय देवगणसोबत ‘फूल और कांटे’ या बॉलिवूड चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि अभिनेत्री रातोरात स्टार झाली. मात्र, मधुने यशाच्या शिखरावर असतानाच बॉलिवूड सोडलं होतं.अशातच अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मधूने तिच्या करिअरमधील बरेच किस्से शेअर केले. त्यादरम्यान, मधुला अमिताभ बच्चन यांच्या सुर्यवंशम चित्रपटाची ऑफरही मिळाली होती पण तिने ती नाकारली. बिग बींचा चित्रपट नाकारण्याचे कारण सांगत अभिनेत्री म्हणाली,  'त्यावेळी काम करुनही मला असमाधानी असल्यासारखं वाटत होतं. मी माझ्या कामाच्या बाबतीत फारशी उत्साहित नसायचे. साऊथमध्ये उत्तम दिग्दर्शकांसोबत काम केलं होतं. पण, माहित नाही मी सेटवर गेल्यावर कायम उदास राहायचे. ज्या गोष्टींची मला सर्वात जास्त आवड होती, त्याच गोष्टींचा मला राग येऊ लागला होता."

त्यानंतर मधुने सुर्यवंशम चित्रपटाच्या ऑफरबद्दल सांगताना म्हणाली, "हा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक मोठा चित्रपट होता, ज्यामध्ये सौंदर्याने काम केलं होतं. त्याचदरम्यान, माझ्या लग्नाची तारीख ठरली होती आणि मी माझ्या सेक्रेटरीच्या सांगितलं की मला हा प्रोजेक्ट करायचा नाही. त्यानंतर निर्मात्यांनी यावर पुन्हा विचार कर असं देखील म्हटलं होतं. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम होते."

मधुच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने १९९० मध्ये मल्याळम चित्रपट ‘ओट्टयाल पट्टलम’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, तिने १९९१ मध्ये तिने अजय देवगणसोबत ‘फूल और कांटे’ या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. 

टॅग्स :मधूअमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमा