Join us

लग्नाच्या ११ दिवसांतच पतीच निधन, ३० वर्षानंतर 'या' अभिनेत्रीने दुसऱ्यांदा थाटला संसार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:55 IST

नव्या आयुष्याची स्वप्न रंगवताना नियतीने पतीला हिरावलं, ३० वर्षानंतर दुसऱ्यांदा थाटला संसार पण घडलं असं काही...

Bollywood Actress: रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं आयुष्य हे सुखकर असतं असं नाही. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखे असतात. अशीच एक अभिनेत्री होती या अभिनेत्रीला कलाविश्वात खूप यश मिळालं मात्र खऱ्या आयुष्यात पण त्यांनी वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. लग्नाच्या ११ दिवसांतच पतीचं निधन झाल्याने अभिनेत्री पूर्णपणे खचली होती. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया...

१९७०-८० च्या दशकात आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे लीना चंदावरकर.लीना चंदावरकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. त्या ७० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीव कुमार, विनोद खन्ना, शम्मी कपूर, दिलीप कपूर या अभिनेत्यांसोबत काम केलं. यशाच्या शिखरावर असताना त्यांनी सिद्धार्थ बंडोडकर यांच्यासोबत लग्न केलं. सिद्धार्थ एक एका राजकीय कुटुंबातून होते. लीना यांचं लग्न झालं तेव्हा त्या फक्त २४ वर्षांच्या होत्या. पण लग्नाच्या अवघ्या ११ व्या दिवशी सिद्धार्थ यांना चुकून गोळी लागली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यानंतर लीना पूर्णपणे खचल्या. लहान वयातच त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती. लीना यांनी काही महिन्यानंतर पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.

पतीच्या निधनानंतर लीना यांना लोकांचे टोमणे देखील ऐकावे लागले. परंतु, त्याचकाळात त्यांनी बैराग चित्रपटातून कमबॅक केलं. याचदरम्यान, त्यांची भेट गायक किशोर कुमार यांच्यासोबत भेट झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किशोर कुमार हे आणि लीना यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. शिवाय तीन वेळा त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळए सुरुवातीला या लग्नाला लीना यांच्या कुटुंबियांकडून विरोध होता. लग्नाच्या ७ वर्षेनंतर, लीना यांनी मुलाला जन्म दिला. पण १९८७ मध्ये किशोर कुमार यांचे निधन झालं. त्या पुन्हा एकट्या पडल्या. त्यानंतर लीना यांनी एकटीने मुलांचा सांभाळ केला.

टॅग्स :बॉलिवूडलीना चंदावरकरसेलिब्रिटीकिशोर कुमार