Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्राईल युद्धादरम्यान दुबईत अडकलेली लारा दत्ता, मायदेशी परतताच झाली भावुक, म्हणाली-"या घटनेमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:53 IST

"तिथे दररोज बॉम्बचे स्फोट...", मुलीसह दुबईत अडकलेली अभिनेत्री भारतात परतली, 'तो' अनुभव सांगत म्हणाली... 

Lara Dutta: सध्या संपूर्ण जगभरात पश्चिम आशियातील देशांमधील वाढत्या संघर्षामुळे तणावाचं वातावरण आहे.अमेरिका आणि इस्त्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेते खामेनेई यांच्यासह अन्य ४० मोठ्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणने आखाती देशांवर हल्ले सुरू केले.मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या फटका आता सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनाही बसल्याचं दिसून आलं.बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील तिची १४ वर्षांची मुलगी सायरासोबत तिथे अडकली  होती, पण ती आता सुरक्षितपणे भारतात परतली आहे.

अलिकडेच काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री लारा दत्ताने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. इस्त्रायल-इराण युद्धादरम्यान,अभिनेत्रीने तिच्या मुलीसह दुबईत अडकली होती. तिथल्या भीषण परिस्थितीचं वर्णन करताना तिला अक्षरशः रडू कोसळलं. एक व्हिडिओ शेअर करत तिनं या सगळ्या परिस्थितीचं वर्णन केलं होतं. 

आता लारा तिच्या मुलीसह सुरक्षितपणे भारतात परतली आहे. त्यानंतर हिंदुस्तान टाईम्ससोबत संवाद साधत अभिनेत्रीने तिथल्या परिस्थितीविषयी भाष्य केलं आहे. लारा म्हणाली,"आम्ही दुबईच्या जेबेल अली फोर्टपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर राहत होतो आणि तिथे दररोज स्फोट होत होते. त्यामुळे आम्ही जीव मुठीत घेऊन आम्ही फुजैराहला दोन तास गाडीने गेलो.कारण मला माझ्या पती आणि कुटुंबासोबत एकत्र राहायचं होतं.

लारा दत्ता मग पुढे म्हणाली, "त्याच्या एक दिवस आधी, फुजैरा बंदर आणि त्याच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर बॉम्ब टाकण्यात आले होते. मी खूप घाबरले होते. त्यावेळी मी अक्षय कुमारसोबत बोलताना त्याला मजेत असंही म्हटलं होतं की आपण एअरलिफ्ट २ चे शूटिंग करत आहोत, असं मला वाटतंय. विमानतळावर स्फोटांचे आवाज आम्हाला ऐकू येत होते. त्यामुळे कुठे काही वाईट घडू नये... यासाठी  आम्ही प्रार्थना करत होतो. या घटनेनंतर माझ्या मुलीच्या मनात भीती निर्माण झाली आहे." असं देखील अभिनेत्रीने सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Lara Dutta recounts Dubai ordeal during Iran-Israel conflict, returns home

Web Summary : Lara Dutta and her daughter were stuck in Dubai amidst Iran-Israel tensions. Explosions near their location instilled fear. Returning safely to India, Lara described the terrifying experience and its impact on her daughter.
टॅग्स :लारा दत्ताबॉलिवूडसेलिब्रिटीइराणइस्रायल