Join us

वयाच्या ३० व्या वर्षी गर्भपात करण्यावर पहिल्यांदाच बोलली बॉलिवूड अभिनेत्री; म्हणाली, "भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:52 IST

भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड...; ३० व्या वर्षी गरोदर राहिली 'ही' अभिनेत्री, 'त्या' निर्णयाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं

Kubra Sait: मनोरंजन विश्वात लग्न, घटस्फोट आणि अफेअर या गोष्टी काही नवीन नाहीत. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काहींनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तर काहींचे १५-२० वर्षांचे संसार मोडले. अशीच एक अभिनेत्री आहे जी सध्या चर्चेत आली आहे. लग्नाआधीच ही अभिनेत्री गरोदर राहिली होती. वन नाईट स्टॅंडनंतर ती गरोदर राहिली पण त्यानंतर तिने बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला. शिवाय स्वत जाऊन गर्भपात केला होता. 

ही अभिनेत्री म्हणजे कुब्रा सैत आहे. कुब्रा सैतने अनेक हिंदी चित्रपट, वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. सेक्रेड गेम्स, जवानी जानेमन, देवा आणि रेडी या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ती आजही ओळखली जाते. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कुब्रा सैतने तिच्या आयुष्यातील या प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे. विरल भयानी ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या द्विधा मनस्थितीबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटलं, "त्या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत आणि मला त्याबद्दल विचार करण्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ मिळाला. मात्र,  तुमच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा तुम्ही एका द्विधा मनस्थितीत सापडता कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या सभोवतालचं जगही तिथं असतं. तुम्हाला तुमची कर्तव्ये काय आहेत हे माहित असते, तुम्हाला माहिती असते की समाज तुमच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतोय.त्यामुळे तुम्हाला चूक आणि बरोबर काय असतं यांच्यात अडकल्यासारखं वाटतं."

मग पुढे कुब्रा सैत तिच्या त्या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाली,"त्यावेळी तुमचा निर्णय योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहित नसतं. पण आज, मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की मी त्यावेळी घेतलेला निर्णय माझ्यासाठी योग्य होता. कारण मला माहित आहे की जरी मी चूक केली असती तरी देव सगळं बघतोय आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागले असते." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावनांना मोकळीक करुन दिली. 

भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड...

याआधीही कुब्राने खुलासा केला होता की या घटनेतून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागला. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान, तिला अनेकदा अस्वस्थ वाटायचे, खूप रक्तस्त्राव व्हायचा आणि चिडचिड व्हायची, परंतु तिने याबद्दल कोणासोबतही चर्चा केली नाही. असंही अभिनेत्रीने सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kubra Sait opens up about abortion at 30, bleeding, and irritation.

Web Summary : Actress Kubra Sait revealed she had an abortion after a one-night stand. She spoke about the emotional turmoil, bleeding, and irritation she experienced. She stands by her decision, acknowledging the difficulty and eventual acceptance of her choice, emphasizing personal conviction.
टॅग्स :कुबरा सैतबॉलिवूडसेलिब्रिटी