Join us

वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिली अन् फसली; एकटीने जाऊन केलं अबॉर्शन, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:23 IST

"मी ३० वर्षांची असताना गरोदर राहिले, अन्...", बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा, काय म्हणाली?

Kubra Sait: 'सुलतान','गल्ली बॉय','देवा' यांसारखे चित्रपट आणि 'सेक्रेड गेम्स ','ट्रिपलिंग','द व्हर्डीक्ट', 'इलीगल', 'द ट्रायल' या वेब सीरिजमुळे अभिनेत्री कुब्रा सैत प्रसिद्धीझोतात आली.आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या राईज अॅंड फॉल या शोमध्ये पाहायला मिळते आहे. याच कार्यक्रमात कुब्राने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे तिची चर्चा होत आहे. या शोमध्ये तिने तिच्या गर्भपाताबाबत वक्तव्य केलं आहे.

वन नाईट स्टँडनंतर गर्भवती राहिल्याने तिने स्वत:च  अबॉर्शन केलं होतं, असं सांगितलं. दरम्यान, या शोमध्ये संगिता फोगाटने कुब्रा सैतला मुलांबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली," मी ३० वर्षांची असताना गरोदर राहिले होते. त्यानंतर मी स्वत: जाऊन गर्भपात केला.एखाद्या व्यक्तीबरोबर आपण राहिलो आणि तो म्हणतो की तुला जे करायचं ते कर. जर त्यालाच आपली काही पडलेली नसते, मग आपण का कोणाचा विचार करायचा? त्या मुलाचं संगोपन करण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे की नाही याचा विचार करणं देखील गरजेचं होतं." अभिनेत्रीचं ते बोलणं ऐकून संगीता आणि अनाया बांगर भावुक होतात.

 दरम्यान,यापूर्वीही कुब्राने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. वन नाईट स्टॅंड नंतर ती गरोदर राहिली होती. शिवाय तिने बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला होता. कारण, त्या जीवाला वाढवण्यासाठी तिचं शरीर फार कमकुवत होतं. असं तिने म्हटलं होतं. 

टॅग्स :कुबरा सैतबॉलिवूडसेलिब्रिटी