Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानला पहिल्यांदा पाहिल्यानंतर जुही चावलाची होती 'अशी' रिअ‍ॅक्शन, म्हणाली-"तो तर खूपच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 09:15 IST

अभिनेत्री जुही चावला आणि शाहरुख खान या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र केले आहेत.

Juhi Chawla : अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांनी 'राजू बन गया जंटलमॅन' या चित्रपटात स्क्रीन शेअर केली. त्यानंतर त्यांच्यामध्ये घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालं. एकमेकांच्या कठीण काळातही ते कायम सोबत राहिले. मग या दोघांची मैत्री आणि ऑनस्क्रिन केमेस्ट्री प्रेक्षकांनाही आवडायला लागली. परंतु शाहरुखसोबत पहिला चित्रपट करताना अभिनेत्याला पाहिल्यानंतर जुही चावलाची काय रिअॅक्शन होती याबद्दल अभिनेत्रीने रंजक किस्सा सांगितला आहे. 

सध्या सोशल मीडियावर जुही चावला आणि शाहरुख यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसतायत. शिवाय शाहरुख खानला पहिल्यांदाच पाहिल्यानंतर अभिनेत्रीला काय वाटलं? याबद्दल तिने सांगितलं. त्या दरम्यान मुलाखतीत अभिनेत्री जुही चावला म्हणाली, "मी त्याला पाहिलं नव्हतं. 'राजू बन गया जंटलमॅन' या चित्रपटाचे निर्माते विवेक वासवानी यांचा चित्रपट साईन केल्यावर मी हिरोबाबत विचारलं होतं. त्याच्याबद्दल मला सांगण्यात आलेलं की तो खूप चांगला अ‍ॅक्टर आहे. शिवाय तो आमिर खानसारखा आहे. असंही सांगितलं गेलं". 

पुढे अभिनेत्री म्हणाली, "मी जेव्हा पहिल्यांदाच शाहरुखला पाहिलं तेव्हा तो खूपच बारीक शरीरयष्टी असलेला सावळ्या रंग तसेच लांब केस असलेला असा त्याचा लूक होता. त्याला पाहिल्यानंतर माझी रिअ‍ॅक्शन होती की, हा हिरो आहे आणि हा कोणत्या अ‍ॅगलने आमिरसारखा दिसतो? असं खुलासा जुहीने केला". 

जुही चावला आणि शाहरुख खान यांनी 'राजू बन गया जंटलमॅन', 'डर', 'यस बॉस', 'फिर भी दिल है हिंदुस्थानी', 'राम जाने' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एवढेच नव्हे तर खऱ्या आयुष्यात ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंडस असून ते दोघे बिझनेस पार्टनर देखील आहेत.

टॅग्स :जुही चावला शाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटी