Join us

श्रद्धा की अंधश्रद्धा? शूटिंगला जाताना 'त्या' सल्ल्यामुळे अभिनेत्याने सोडलेली फ्लाईट; हिमानी शिवपूरींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:33 IST

शूटिंगला जाताना 'त्या' सल्ल्यामुळे अभिनेत्याने सोडलेली फ्लाईट, हिमानी शिवपूरींनी सांगितला किस्सा

Himani Shivpuri: बॉलिवूडडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनय कौशल्याने चित्रपटांमध्ये आई, मावशी, आजी आणि आजीची पात्रे जिवंत केली आहेत. ती पात्रं जरी छोटी असली तरी ती महत्त्वाची असून, आपल्या अभिनय सामर्थ्याने त्या कलावंतांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली होती. अशाच मोजक्या पात्रांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे हिमानी शिवपूरी. आपल्या कारकि‍र्दीत त्यांनी शाहरुख खान, सलमान खान गोविंदा यांच्यासह अनेक कलाकारांसोबत पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, गोविंदासोबत त्या खूप काम केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिमानी शिवपुरी यांनी गोविंदाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

आपल्या आजवरच्या कारकि‍र्दीत हिमानी शिवपूरीं यांनी अनेक चित्रपटांमध्ये सुषमा सेठ यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. 'साजन चले ससुराल', 'हीरो नंबर वन', 'जिस देश में गंगा रहता है', 'हद कर दी आपने', 'एक और एक ग्यारह' और 'जोड़ी नंबर वन' अशा चित्रपटांमध्ये त्यांनी गोविंदासोबत काम केलं आहे. नुकत्याच रेडिओ एफएमला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी गोविंदा अंधश्रद्धेवर आधारित निर्णय घ्यायचा असं म्हटलं आहे. या मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या, "त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. परंतु, काही काळानंतर गोष्टी थोड्या वेगळ्या वाटू लागल्या. तो मुहूर्तावर आणि ज्योतिषांनी सांगितलेल्या वेळेवर विश्वास ठेवू लागला होता."

तो किस्सा सांगत म्हणाल्या....

त्यानंतर हिमानी शिवपूरी म्हणाल्या," आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला जात होतो. अरुणा इराणी त्या चित्रपटाच्या निर्मात्या होत्या. तेव्हा मी, रवीना टंडन, अरुणा आणि दिग्दर्शक कुकू कोहली तिघेही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की गोविंदा गायब आहे तो विमानात चढलाच नाही. त्यावेळी कुकू घाबरले ते मला म्हणाले, अगं चीची कुठे आहे. पण अरुणाने त्यांना शांत केलं आणि ती म्हणाली तुम्ही पुढे जा मी पुढच्या फ्लाईटने त्याला घेऊन येते. ती गोविंदाच्या घरी गेली आणि संध्याकाळच्या फ्लाईटमध्ये त्याला शूटला घेऊन आली. मला खरंच माहित नाही की त्याला नेमकं काय झालं होतं. पण, तो कायमच आमच्यासोबत आदराने वागला. गोविंदाबरोबर काम करताना मजा यायची." असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :बॉलिवूडगोविंदासेलिब्रिटी