Join us

अभिषेक बच्चन जावई व्हावा, हेमा मालिनींची होती इच्छा; 'या' कारणामुळे ईशा देओलने दिलेला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 10:56 IST

भरत तख्तानींऐवजी हेमा मालिनीला करायचं होतं अभिषेकला जावई; नेमकं कुठं बिनसलं?

Esha Deol: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.साल २०१२ मध्ये ईशा देओलने उद्योगपती भरत तख्तानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, १२ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर भरत तख्तानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर आपल्या नात्याची कबुली देत गर्लफ्रेंडचा फोटो शेअर केला.त्यामुळे पु्न्हा एकदा ईशा देओल चर्चेचा विषय ठरली. पण, तुम्हाला माहितीये का भरत तख्तानी यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री हेमा मालिनी यांची जावई म्हणून बॉलिवूडच्या एका  प्रसिद्ध अभिनेत्याला पसंती होती. शिवायल लेक ईशा आपली ही आपली इच्छा पूर्ण करेल असंही त्यांना वाटलं होतं.पण, प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं. 

दरम्यान, हेमा मालिनी यांनी काही वर्षांपूर्वी करण जौहरच्या एका शोमध्ये म्हटलं होतं की, अभिषेक बच्चन आपला जावई असा अशी त्यांची इच्छा होती. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांचे कौटुंबीक संबंध फार चांगले होते. त्यामुळे अभिषेक बच्चनला लहानाचं मोठं होताना पाहिलं होतं. त्यामुळे आपल्या लेकीसाठी लाईफ पार्टनर म्हणून अभिषेक चांगला मुलगा आहे, असं त्यांना वाटतं होतं. 

त्यानंतर अभिनेत्री ईशा देओलला 'इंडिया फोरम' च्या मुलाखतीत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्या आईच्या त्या वक्तव्याबद्दल विचारल्यानंतर ईशा म्हणाली, माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते.तिने अभिषेकच नाव घेतलं कारण तो त्यावेळी मोस्ट बॅचलर होता. तिला मी एका चांगल्या व्यक्तीसोबत लग्न करावं असं वाटत होतं आणि तिच्या मते, अभिषेक बच्चन हा माझ्यासाठी योग्य मुलगा होता. पण, मी त्याच्याकडे एक भाऊ म्हणून पाहते त्यामुळे मी त्याच्याशी लग्न करु शकत नाही.यासाठी मी आईची माफी मागते. असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यानंतर ईशा देओलने तिचा लहानपणीचा मित्र भारत तख्तानी यांच्यासोबत लग्न केलं. पण, दुर्दैवाने हे नातं फार काळ टिकलं नाही. 

टॅग्स :हेमा मालिनीइशा देओलबॉलिवूडसेलिब्रिटी