Bollywood Actress Fitness : मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळ पडद्यावर सुंदर आणि फिट दिसण्यासाठी प्रचंड मेहनत करताना दिसताना. जिम, योगा तसेच डाएट यांसारख्या गोष्टींवर ते कटाक्षाने लक्ष देत असतात. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आई झाल्यानंतर तिचं वजन खूप वाढलं होतं. मात्र, अवघ्या १० दिवसांत तिने चक्क १० किलो वजन कमी केलं. अभिनेत्रीने तिच्या या वेटलॉस जर्नीबद्दल खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे गौहर खान.
अभिनेत्री गौहर खानने नुकतीच 'देबिना बॅनर्जी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री कोणताही शॉर्टकट न वापरता कसं वजन कमी केलं याबद्दल सांगितलं. त्यादरम्यान, गौहर तिच्या फिटनेस जर्नीविषयी सांगताना म्हणाली, 'मला माहित होतं की मी पुन्हा पडद्यावर येणार आहे, आणि ही गोष्ट मी हलक्यात घेऊ शकत नव्हते. तेव्हा सहा महिने मी स्तनपान केलं. पण त्या सहा महिन्यांत मी माझ्या जेवणाकडे जास्त लक्ष दिले नाही कारण मी स्तनपान करत होते आणि ती जबाबदारी माझ्यावर होती. त्यासाठी आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सने परिपूर्ण असलेलं अन्न मी खात होते.
पुढे अभिनेत्री म्हणाली, जेहानच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी, मी त्याला स्तनपानाप करणं बंद केलं. त्या दिवसापासून मी फक्त सॅलडयुक्त आहार घेण्यास सुरुवात केली. माझा आहार फक्त हिरव्या पालेभाज्या आणि सूप होता. मी तोंडावर ताबा ठेवला. शिवाय मी जास्त जेवण करत नव्हते. पण ते सॅलड आणि सूप पीत होते. शिवाय मी नॉनव्हेजसुद्धा खाणं सोडलं. कारण त्याच्यामध्ये खूप कॅलरीज असतात. या सगळ्या गोष्टी मी केल्या. असा खुलासा अभिनेत्रीने केला.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वीच गौहर जैद दरबारसोबत निकाह केला होता. तर २०२३ साली तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. तिला गोंडस मुलगा झाला. तर आता लेकाच्या जन्मानंतर दोन वर्षात गौहर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी गौहर आणि जैद आतुर आहेत.