Esha Gupta : सध्या संपूर्ण जगभरात इराण-इस्त्राईल यांच्यातील तणापूर्ण परिस्थितीमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, आणि इस्त्राइल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला आहे. इस्त्राईलने केलेल्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देत इराणने प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केल्याने युद्धाचा भडका उडाला. या तणापूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांमधील हवाई सेवा विस्कळित झाली असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.परिणामी अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले होते. त्या काही सेलिब्रिटींचीही नावे समोर आली होती.त्यापैकीच एक नाव म्हणजे इशा गुप्ता.
इराण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईत अडकलेली इशा गुप्ता आता मायदेशी परतली आहे.ईशा गुप्ताने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर रत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.अभिनेत्रीने या कठीण काळात तिला सहकार्य करणाऱ्या एअरलाइन अधिकारी, प्रशासन आणि हॉटेल कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. भारतात परतल्यानंतर ईशा गुप्ताने खास पोस्ट शेअर करत त्यामध्ये म्हटलंय, “मी सुखरूप घरी परत आले आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. ज्या परिस्थितीत आम्ही होतो, तो खूप कठीण काळ होता. ही देवाची कृपा आहे की, आम्ही सुरक्षित आहोत."
यापुढे अभिनेत्रीने लिहिलंय,"२८ तारखेला, रविवारी मी विमानतळावर होते. दुपारी १ वाजेपर्यंत विमानतळ बंद करण्यात आले. सर्वत्र गोंधळ होता. काय झालं आहे हे कोणालाच समजत नव्हते. मग क्षेपणास्त्र हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या.पुढच्या मिनिटाला काय होईल हे आम्हाला माहीत नव्हते. अनोळखी लोक एकमेकांना धीर देत होते. सर्वजण आपापल्या घरी फोन करत होते."
आम्ही घाबरलो होतो, पण…
"त्यावेळी परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, मोबाईलवर सतत संरक्षित ठिकाणी आश्रय घ्या,असे अलर्ट येत होते. आम्ही घाबरलो होतो, पण युएई प्रशासनानं आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी परिस्थिती खूप संयमानं हाताळली," असंही तिनं नमूद केलं."अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
Web Summary : Actress Esha Gupta, stranded in Dubai due to the Iran-Israel conflict, has returned home safely. She thanked airline staff, UAE authorities and hotel staff for their support during the tense situation. She shared that the situation was difficult, but with God's grace, she is safe.
Web Summary : ईरान-इज़राइल संघर्ष के कारण दुबई में फंसी अभिनेत्री ईशा गुप्ता सुरक्षित घर लौट आई हैं। उन्होंने तनावपूर्ण स्थिति के दौरान समर्थन के लिए एयरलाइन कर्मचारियों, यूएई अधिकारियों और होटल कर्मचारियों को धन्यवाद दिया। उन्होंने साझा किया कि स्थिति कठिन थी, लेकिन भगवान की कृपा से, वह सुरक्षित हैं।