Join us
Daily Top 2Weekly Top 5

"Woman You Are Enough" घटस्फोटानंतर महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच व्यक्त झाली ईशा देओल, म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 13:11 IST

अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Esha deol : अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल अलिकडेच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती.  पती भरत तख्तानीपासून घटोस्फोट घेत अभिनेत्री विभक्त झाली आणि त्यांच्या नात्याला तिने अखेरीस पूर्णविराम दिला. भरत तख्तानी आणि ईशा देओल यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. पण, लग्नाच्या ११ वर्षानंतर त्यांचा सुखी संसार मोडला.

या दोघांनी घटस्फोटाची घोषणा करण्यापूर्वीच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ही घोषणा करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत होते. आता दोघेही वेगळे झाले असून ईशा आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, अभिनेत्री ईशा देओलने महिला दिनानिमित्त तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आली आहे.

''माझ्या आयुष्यातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा! तुम्हाला सलाम आणि तुम्हाला अधिक शक्ती मिळो.  मी तुमच्यापैकी प्रत्येकावर माझ्या मनापासून प्रेम करते शिवाय मी माझ्या आयुष्यातील सर्व पुरुषांचे आभार मानते की ते आमच्या पाठीशी खंबीपणे उभे राहिले. आमच्या पंखात नव्यानं उभारी घेण्यासाठी त्यांनी बळ दिलं.'' असं लक्षवेधी कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय. 

टॅग्स :इशा देओलबॉलिवूडसेलिब्रिटी