Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला ते कधीच नको होते...", खामेनेईंच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर, म्हणाली- "गेल्या ४७ वर्षांपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:40 IST

इराणमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तेहरान आणि सॅक्रेड गेम्समध्ये दिसलेली अभिनेत्री एलनाझ नोरोजी हिने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

अमेरिका-इस्रायल-इराण या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटताना दिसत आहेत. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई मारले गेले. संपूर्ण जग यामुळे हादरुन गेलं. यावर इराणमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तेहरान आणि सॅक्रेड गेम्समध्ये दिसलेली अभिनेत्री एलनाझ नोरोजी हिने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओत एलनाझ म्हणते, "अनेकांनी मला मेसेज केले की युद्ध सुरू झालं आहे. मला इथे खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जी तुम्हाला माहीत असली पाहिजे. तुमच्यापैकी अनेकांना इराणमध्ये काय घडतंय हे माहित नसेल. या युद्धात जर कोणी मारलं जात असेल...इराणचा नागरिक...इथले हुकुमशाहा जे गेल्या ४७ वर्षांपासून इराणमध्ये राज्य करत होते. इथल्या इराणी नागरिकांनी ते कधीच नको होते. गेल्या ४७ वर्षांपासून त्यांची सत्ता घालवण्यासाठी आंदोलनं होत आहेत. गेले दोन महिने हे आणखीनच वाईट होते. आणि म्हणूनच ते मारले गेले". 

"जर या युद्धात कोणी मारलं गेलं तर तो पूर्णपणे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या चुकीमुळे असेल. कारण लोकांनी अनेकदा सांगूनही त्यांनी सत्ता सोडली नाही. त्यांना सत्तेत राहायचं होतं. अमेरिका आणि इस्रायलचं नामोनिशाण मिटवण्यासाठी अण्वस्त्र बनवण्यात येत होते...याची काय गरज होती? आम्ही सगळे इराणी नागरिक याच्या विरोधात होतो. हे युद्ध इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमुळे सुरू झालं आहे. जर त्यांनी हे सगळं वेळीच थांबवलं असतं. हमास, हुथीस, हिजबुल्लासारख्या दहशतवादी संघटनांना मदत करण्याचं त्यांनी थांबवलं असतं. इराणी नागरिकांचं ऐकलं असतं तर हे युद्ध झालं नसतं. आम्हाला ही सत्ता नको होती. तुम्ही या देशातील लोकांचं ऐकलं पाहिजे", असंही तिने म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood actress reacts to Khamenei's death, criticizes Iranian regime.

Web Summary : Following Ayatollah Khamenei's reported death, Bollywood actress Elnaaz Norouzi criticized the Iranian regime. She stated Iranians never wanted the current leaders, who have ruled for 47 years, blaming them for the ongoing conflict and support of terrorist groups. She urged the world to listen to the Iranian people.
टॅग्स :इराणयुद्धइस्रायल