Sanya Malhotra: अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही नाव दंगल चित्रपटामुळे नावारुपाला आली. करिअरमधील पहिलाच चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटात तिने कुस्तीपटू बबिता कुमारीची भूमिका साकारली.दंगलच्या यशानंतरही सान्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या सान्या मल्होत्रा 'टोस्टर' या चित्रपटात दिसली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. सान्याने नुकतेच इंडस्ट्रीत दहा वर्षे पूर्ण केली आहेत. यादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या संघर्ष काळातील आठवणी शेअर केल्या.
अलिकडेच 'न्यूज १८' शी बोलताना, सान्या मल्होत्राने काळानुसार तिच्यात झालेल्या बदलांविषयी भाष्य केलं.काळानुसार, मी नाही म्हणायला शिकले आहे. आता मी अगदी सहजपणे नाही म्हणते, पण इथपर्यंत पोहोचायला वेळ लागला.पूर्वी, नाही कसं बोलू या नुसत्या कल्पनेनेच मला पॅनिक अटॅक यायचे.
आपण नाही म्हटल्यास आपल्याला काम गमवावं लागेल, ही सान्याची सर्वात मोठी भीती होती. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ती म्हणाली, मी नकार कसा देऊ शकेन, असा मला अनेकदा प्रश्न पडायचा. मला भीती वाटायची की, नकार दिल्यास भविष्यात कोणी मला काम देणार नाही. आणि जरी मी कसेबसे नाही म्हणण्याचे धाडस केले, तरी मला अनेक महिने त्याचा पश्चात्ताप व्हायचा.मला केवळ माझ्या करिअरचीच चिंता नव्हती, तर माझ्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल याचीही भीती वाटत होती." अशा भावना अभिनेत्रीने यावेळी व्यक्त केल्या.
Web Summary : Despite success, Sanya Malhotra feared saying 'no' due to potential job loss. She worried about hurting others and career consequences, a fear she now overcomes.
Web Summary : सफलता के बावजूद, सान्या मल्होत्रा को नौकरी छूटने के डर से 'ना' कहने से डर लगता था। अब वह इस डर पर काबू पा चुकी हैं।