Daisy Shah: अभिनयाच्या चंदेरी दुनियेत अनेकजण कलाकार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून येत असतात. मात्र, हे स्वप्न पूर्ण करताना बऱ्याचदा चांगले वाईट अनुभवही वाट्याला येतात. विशेष म्हणजे मुली या वाईट प्रसंगाच्या बळी ठरतात. काही जण ते निमुटपणे सहन करतात तर काही जण वेळीच अद्दल घडवतात. अनेक कलाकार देखील त्यांच्या या अनुभवांवर वेगवेगळ्या मुलाखतीत उघडपणे बोलत असतात. अशातच 'जय हो' फेम अभिनेत्री डेझी शाहने तिच्यासोबत मुंबई आणि जयपूरमध्ये घडलेला कटू अनुभव शेअर केला.
दरम्यान, अलिकडेच अभिनेत्री डेझी शाहने 'हाउटरफ्लाई'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत डेझीने डोबिंवलीमध्ये तिच्यासोबत घडलेल्या भयावह किस्सा सांगितला. त्याविषयी बोलताना ती म्हणाली, डोबिंवलीत माझ्यासोबत एक घटना घडली होती. जेव्हा फुटपाथवर चालत होते त्यावेळी अज्ञात माणूस माझा पाठलाग करत होता. त्या व्यक्तीने खूप चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला आणि मी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती कोण आहे,पण त्या परिसरात खूप गर्दी होती. असा खुलासा अभिनेत्रीने केला. त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी असल्यामुळे आपण रिअॅक्ट केलं नाही, असंही तिने सांगितलं.
त्यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान घडलेल्या एका वाईट प्रसंगाविषयी सांगताना डेजी म्हणाली, आम्ही जयपूरच्या एका हवेलीमध्ये गाण्याचं शूट करत होतो.ते एक प्रसिद्ध ठिकाण आहे. शिवायते एक पर्यटन स्थळ देखील आहे.तिथे येण्या-जाण्यासाठी फक्त एकच गेट आहे. तेव्हा तिथे जवळपास ५०० लोक आणि २०० डान्सर होते. जेव्हा त्यांनी पॅक-अप झालं असं सांगितलं तेव्हा सर्वजण त्या गेटवरून पळू लागले आणि त्या गर्दीत कोणीतरी माझ्या पाठीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला."
या मुलाखतीत डेजी म्हणाली, "मला प्रचंड राग आला होता.त्या रागाच्या भरात मी माझ्या आजुबाजूला कोण आहे पाहिलंच नाही. मी माझ्या मागे असलेल्या लोकांना मारायला सुरुवात केली.जो मला दिसेल त्याला मी मारलं, कारण मी खूप रागावले होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर एकाने मला थेट धमकी दिली होती, मी म्हणाले, हो दाखव तू काय करणार आहेस. त्यालाही मी म्हणाले, की हो, तू दाखव की तू काय करु शकतो.मी त्याला मारलं देखील होतं. कारण, मी मुलगी आहे म्हणून तो नीट बोलत नव्हता." असं डेजीने मुलाखतीत सांगितलं.