Aneet Padda Cinema: बॉलिवूडसिनेमांच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'सैयारा' हे नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. मोहित सुरी दिग्दर्शित या सिनेमाने जे-झींना अक्षरश: वेड लावलं. ‘सैयारा’ने देश-विदेशात मिळून ३०० कोटींची कमाई केली. या चित्रपटामुळे इंडस्ट्रीला दोन उभरते कलाकार दिले. त्यापैकीच एक नाव म्हणजे अनीत पड्डा. नव्या पिढीतील स्टार म्हणून अनित पड्डा ओळखली जात आहे. या चित्रपटानंतर अनीतकडे मोठ्या प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. सध्या अनीत तिच्या आगामी 'शक्ती शालिनी' या प्रोजेक्टमुळे प्रसिद्धीझोतात आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच डिसेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच आता या चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'शक्ती शालिनी' चित्रपटाची कथा बंगालच्या लोककथा आणि पौराणिक गोष्टींवर आधारित आहे. मात्र, या चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डा दुहेरी भूमिका निभावताना दिसणार असल्याची माहिती मिळते आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हॉरर कॉमेडी असलेल्या 'शक्ती शालिनी'मध्ये अनीत पड्डा डबल रोलमध्ये दिसणार आहे. यामध्ये शालिनी हे पात्र एका वाईट शक्तीपासून प्रेरित आहे, जिच्या मनात बदलाची भावना असते. तर सिनेमात शक्ती एका सामान्य स्त्रीची भूमिका आहे. मात्र, वेळ आल्यावर ती आपल्या कुटुंबासाठी कशी ढाल बनून उभी राहते, हे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत.
रिपोर्टनुसार, ही कथा एका सूड घेणाऱ्या महिला भुताभोवती फिरते. ही आत्मा झाडांमध्ये आणि पाण्याजवळ राहते आणि पुरुषांना शिक्षा देते, कारण तिच्याशी अन्याय झाला होता. दरम्यान, मुंबईत या चित्रपटाचं शूट करण्यात आलं आहे. या चित्रपटात अनीत पड्डासह विशाल जेठवा आणि विनीत कुमार सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Web Summary : After 'Sairat' success, Aneet Padda will star in 'Shakti Shalini', a horror-comedy where she plays a double role. The film, set for a December 2026 release, features her as Shakti, a normal woman, and Shalini, a vengeful spirit. Vishal Jethwa and Vineet Kumar Singh also star.
Web Summary : 'सैराट' की सफलता के बाद, अनीत पड्डा 'शक्ति शालिनी' में डबल रोल में दिखेंगी। यह हॉरर-कॉमेडी फिल्म दिसंबर 2026 में रिलीज होगी। इसमें वह शक्ति और शालिनी नामक दो किरदार निभाएंगी। विशाल जेठवा और विनीत कुमार सिंह भी हैं।