Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाचा खर्च आला फक्त 1 लाख, पुण्याच्या मंदिरात गुपचूप केला 'विवाह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:04 IST

पुण्यातील कात्रज परिसरातील इस्कॉन मंदिरातच त्यांनी गुपचूप लग्न केले.

'विवाह' फेम अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आता सिनेमात फारशी काम करताना दिसत नाही. तिने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या ती सुखी संसारात मग्न आहे. 9 वर्षांपूर्वी अमृताने बॉयफ्रेंड अनमोलसोबत लग्न केले. पुण्यात गुपचूप त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नासाठी केवळ १ लाख रुपये खर्च झाल्याचं अमृताने म्हटलं आहे. अमृता आणि पती आरजे अनमोल दोघांनी मिळून 'कपल ऑफ थिंग्स' हे पुसतक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी लग्नात झालेल्या खर्चाचा खुलासा केला आहे.

15 मे 2014 रोजी अमृता आणि आरजे अनमोल विवाहबंधनात अडकले.  पुण्यातील कात्रज परिसरातील इस्कॉन मंदिरातच त्यांनी गुपचूप लग्न केले. अमृताच्या लग्नाची माध्यमांना कानोकान खबर नव्हती. लग्नात किती खर्च आला याविषयी त्यांनी पुस्तकात लिहिलं की, "आमच्या लग्नात १ लाख ५० रुपये इतका खर्च आला. यामध्ये कपडे, ठिकाण, प्रवास आणि इतर सामानाच्या खर्चाचा समावेश होतो."

अमृता म्हणाली, "आम्हाला दोघांनाही फार काही डिझायनर कपडे घालायचे नव्हते. आमच्या कपड्यांचा खर्च केवळ ३ हजार रुपये होता तर लग्नस्थळासाठी ११ हजार रुपये देण्यात आले होते. अमाप पैसा खर्च करुन लग्न करणं हा दिखावा आम्हाला नव्हता करायचा. आमचे जवळचे मित्र नातेवाईक यांच्या उपस्थितीतच आम्हाला लग्न करायचं होतं."

'विवाह'नंतर अमेरिकेहून आले स्थळ

अमृता आणि शाहीद कपूरचा विवाह सिनेमा आजही सर्वांचा आवडीचा आहे. या सिनेमानंतर अनेकांना अमृता सारखीच बायको, सून हवी होती. अमृता म्हणाली,"तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते. सिनेमा रिलीज झाल्यानंतर आमच्या घरी लेटर आणि फोटो यायला लागले. अमेरिका, कॅनडामधील मुलं त्यांच्या घराचे, आईवडिलांसोबतचे फोटो पाठवायला लागले. हे बघून मला खूप हसू यायचं. तुमची एक भूमिका काय जादू करुन जाते हे मला कळलं."

टॅग्स :अमृता रावपरिवारपती- जोडीदारलग्न