Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छावा'चा टीझर लीक! संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कोशलचं रौद्ररुप, या तारखेला होणार सिनेमा रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 13:06 IST

विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाचा टीझर लीक झालाय. विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय (

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीला आपण आजवर रोमँटिक, अॅक्शन आणि इमोशन्स या अंदाजात बघितलंय. विकीच्या आगामी 'छावा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'छावा' सिनेमातील विकीचा लूक व्हायरल झाला होता. आता नुकतंच 'छावा' सिनेमाचा टीझर लीक झालाय. नुकत्याच रिलीज झालेल्या 'स्त्री २' सिनेमाच्या आधी 'छावा' सिनेमाचा टीझर दाखवला जातोय. या टीझरमध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकीचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. 

'छावा'चा टीझर लीक

नुकतंच X वर 'स्त्री २' हा सिनेमा ट्रेंडिंग होतोय. राजकुमार राव-श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' सुरु व्हायच्या आधी प्रेक्षकांना विकी कौशलच्या 'छावा'ची झलक बघायला मिळतेय. लीक झालेल्या टीझरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आक्रमक अवतारात दिसत आहे. गनिमांशी एकहाती सामना करणाऱ्या संभाजी महाराजांच्या रौद्ररुपात विकी झळकतोय. या टीझरमध्ये शेवटी सिंहासनावर आरुढ झालेले संभाजी महाराज बघायला मिळत आहे. विकीला संभाजी महाराजांच्या रुपात बघणं ही एक पर्वणी असणार यात शंका नाही. 

या तारखेला रिलीज होणार 'छावा'

'छावा' सिनेमाचा टीझर लीक होताच प्रेक्षकांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय. विकी कौशलच्या संभाजी महाराजांच्या लूकला आणि त्याच्या अभिनयाला चाहत्यांनी पसंती दिलीय. 'छावा' सिनेमाच्या लीक झालेल्या टीझरमध्ये सिनेमाची रिलीज डेटही बघायला मिळतेय. ६ डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूूमिकेत झळकणार आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही विशेष भूमिकेत पाहायला मिळतोय. 

टॅग्स :विकी कौशलसंभाजी राजे छत्रपती