Border 2 Movie Sunny Deol Frist Look:बॉलिवूड अभिनेता सनी देओलची (Sunny Deol) मुख्य भूमिका असलेल्या 'गदर-२' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यात आता त्याचा 'जाट' या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटांच्या यशानंतर लवकरच अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'बॉर्डर-२' मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ११९७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रत्येक अपडेट जाणूस घेण्यास प्रेक्षक प्रचंड उत्सुक असतात. अलिकडेच या चित्रपटाच्या रिलीज डेटवरुन पडदा हटविण्यात आला होता. त्यात आता सनी देओलचा 'बॉर्डर-२' च्या सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे.
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत 'बॉर्डर' या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ‘बॉर्डर २’ कधी येणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. २०२६ मध्ये हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या 'बॉर्डर २' सिनेमाचं शूटिंग डेहराडूनमधील हलदुवाला येथे सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, उत्तराखंड चित्रपट विकास परिषदेचे सीईओ बंशीधर तिवारी यांनी आज चित्रपटाच्या सेटवर सनी देओलची भेट घेतली. यावेळी 'बॉर्डर २' चे दिग्दर्शक अनुराग सिंग आणि कौन्सिलचे सह-सीईओ डॉ. नितीन उपाध्याय त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये सनी देओलचा पहिला लूक समोर आला आहे.
दरम्यान, या व्हायरल फोटोंमध्ये सनी देओल लष्करी गणवेशात दिसत आहे. तसेच हातात बंदूक आणि डोक्यावर पगडी अशा लूकमध्ये तो पाहायला मिळतो आहे. अभिनेत्याचे हे फोटो पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसारखे अनेक स्टार दिसणार आहेत.
दरम्यान, जवळपास २७ वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पण या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जेपी दत्ता नाही तर अनुराग सिंह यांच्या खांद्यावर आहे. अनुराग सिंह यांनी याआधी अक्षय कुमारचा 'केसरी','पंजाब १९८४' सह अनेक सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.