Join us

सनी देओलचा 'जाट' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:44 IST

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर सनी देओलचा 'जाट' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार; कधी, कुठे जाणून घ्या...

Jaat Movie: बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असेलला 'जाट' हा  सिनेमा १९ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. १०० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर 'जाट'ने चांगली कमाई केली. दरम्यान, बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शनास सज्ज झाला आहे. 

सोशल मीडियावर नेटफ्लिक्सवर सनी देओलचा खास व्हिडीओ शेअर करत ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ५ जून २०२५ पासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत ऑनलाईन स्ट्रिम होणार आहे. थिएटरमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर, 'जाट' आता नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे.

दरम्यान, या चित्रपटात सनी देओलसोबत रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, रेजिना कॅसांड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष सारखे दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली. 

टॅग्स :सनी देओलरणदीप हुडाबॉलिवूड