Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून दाक्षिणात्य चित्रपटात काम करत नाही", सुनील शेट्टीचा मोठा खुलासा, म्हणाला-"बॉलिवूड कलाकारांना ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:47 IST

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम का करत नाही? सुनील शेट्टीने सांगितलं खरं कारण, म्हणाला...

Suniel Shetty : हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांचा उल्लेख केला तर गाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुनील शेट्टीचं नाव घ्यावं लागेल. आजवर अनेक चित्रपटांतून काम केलेल्या या अ‍ॅक्शन हिरो सुनील शेट्टीला चित्रपटसृष्टीत अण्णा या नावाने ओळखलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीत 'बलवान', 'दिलवाले', 'अंत', 'मोहरा', 'गोपी किशन', 'कृष्णा रक्षक', 'बॉर्डर',' भाई',' हेराफेरी', 'धडकन' असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत.दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. 

'द लल्लनटॉपला' दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. शिवाय मुलाखतीत त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तेव्हा तो म्हणाला, "मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील भूमिकांसाठी अनेकदा विचारणा झाली आहे. पण, दुर्दैवाने फक्त नकारात्मक भूमिकासांठी विचारलं जातं. ते हिंदी चित्रपटातील नायकांना पडद्यावर नकारात्मक भूमिकेत दाखवतात, हे मला आवडत नाही."

सुनील शेट्टीने यापूर्वी एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या अॅक्शन थ्रिलर "दरबार" मध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती आणि त्यात नयनतारा देखील होती.मात्र, त्यानंतर तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसला नाही.  यानंतर मग पुढे सुनील शेट्टी यांनी सांगितलं की, "मी रजनीकांत यांच्याबरोबर एक चित्रपट केला, कारण  मला त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. मोठ्या पडद्यावर मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं."

मी एका तुलु  चित्रपटात काम केलं, कारण...

या मुलाखतीत सुनील शेट्टीने नुकतंच त्यांनी एका तुलू चित्रपटात काम केलंय असंही त्यांनी म्हटलं.कारण,तेथील स्थानिक भाषेतील चित्रपटांना  पाठिंबा देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे, असं तो म्हणाला.

सुनील शेट्टीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अलिकडेच ते  केसरी वीर आणि "नादानियां" या चित्रपटांमध्ये दिसले होते. लवकरच ते प्रियदर्शन यांच्या हेरा फेरी ३ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty reveals reason for not working in South films.

Web Summary : Suniel Shetty discloses he avoids South films due to negative roles offered to Bollywood actors. He acted with Rajinikanth out of admiration and supports Tulu cinema. Shetty will be seen in 'Hera Pheri 3'.
टॅग्स :सुनील शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा