Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर मारलं अन्"; 'सिकंदर का मुकद्दर' फेम अभिनेत्याने सांगितला सेटवर घडलेला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 10:18 IST

सध्या बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Avinash Tiwary: सध्या बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेरसिकांसाठी ही जणू मनोरंजनाची पर्वणीच आहे. अशातच बॉलिवूडमध्ये एका चित्रपटाविषयी जोरदार चर्चा होताना दिसते आहे. हा चित्रपट म्हणजे 'सिकंदर का मुकद्दर' आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. दरम्यान, 'लैला मजनु' फेम अभिनेता  अविनाश तिवारी देखील या चित्रपटात झळकला आहे. यापूर्वी अविनाशने अमिताभ बच्चन यांच्या सायकोलॉजिकल थ्रिलर टीव्ही शो 'युद्ध' मध्ये काम केलं होतं. आता बऱ्याच वर्षानंतर त्याला बिग बींसोबत पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. दरम्यान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने 'युद्ध' शोच्या सेटवर घडलेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नुकतीच अमिताभ बच्चन आणि अविनाश तिवारीने 'स्क्रीन लाईव्ह'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेता अविनाश तिवारीने 'सिकंदर का मुकद्दर' च्या सेटवर घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा मुलाखतीत अविनाश म्हणाला, "जेव्हा मी टीव्ही शो 'युद्ध' मध्ये अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच भेटलो होतो त्यावेळी मला एक अ‍ॅक्शन सीन शूट करायचा होता. मी त्याआधी कधीच अ‍ॅक्शन सीन केलेला नव्हता. सीन सुरू होता तेव्हा मी अमिताभ यांना पहिल्यांदा डोक्यावर मारलं. त्या अ‍ॅक्शन शूट दरम्यान त्यांनी मला पहिल्यांदा मारायचं होतं ते जेव्हा मारायला येतील मी स्वत:च बचाव करताना त्यांना पलटवार करतो असा तो सीन होता. त्यावेळी मला खूपच वाईट वाटलं."

पुढे अभिनेता म्हणाला, "मग पुढे मी अमिताभ बच्चन यांच्याजवळ गेलो आणि त्यांची माफी मागितली. तसंच घाबरत मी त्यांना म्हणालो की, आपल्याला याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यावर ते त्यांच्या डोक्याला हात लावून म्हणाले की, तुम्हाला हा माणूस नक्की कुठे सापडला?  त्यानंतर मग ते मला म्हणाले, आपण हा सीन सावकाश आणि हळूहळू शूट करू." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

अविनाश तिवारी 'सिकंदर का मुकद्दर' या चित्रपटामुळे प्रसिदधीझोतात आला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर शुक्रवारी (२९ नोव्हेंबर)ला स्ट्रीम झाला आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी