Hasee Toh Phasee Re-release : गेल्या काही वर्षांमध्ये जुन्या चित्रपटांचा पुन प्रदर्शनाचा प्रकार ट्रेंडमध्ये आला आहे. थिएटरमध्ये कोणतेही नवीन सिनेमे रिलीज होत नसतील तर त्यावेळेस निर्माते जाणीवपूर्वक आपले जुने चित्रपट रि-रिलीज करतात. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसतोय. याची उत्तम उदाहरणं म्हणजे 'सनम तेरी कसम', 'रहना है तेरे दिल में' तसेच 'तुझे मेरी कसम' हे सिनेमे आहेत. गतवर्षी हे सिनेमे रि-रिलीज करण्यात आले. पु्न: प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. अशातच आता १२ वर्षांपूर्वीचा एक हिट सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात येणार असल्याची अपडेट मिळते आहे. कोणता आहे सिनेमा, जाणून घेऊया...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दरम्यान, या चित्रपटाचं नाव हंसी तो फंसी आहे. धर्मा आणि फॅन्टम प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची मुख्य भूमिका आहे. 'हसी तो फसी' हा चित्रपट साल २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. आता जवळपास १२ वर्षानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात पाहता येणार आहे. विनील मैथ्यू दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे ₹३६.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. हा चित्रपटातील गाणी ही खास आकर्षण होती. अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मा प्रॉडक्शन आणि पीव्हीआर-आयएनओएक्सने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट ६ मार्च रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात रि-रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
हंसी तो फंसी चित्रपटात सिद्धार्थने निखिलची भूमिका केली होती, जो एक बिझनेसमन असतो. या चित्रपटात अदा शर्माने निखिलची प्रेयसी करिश्माची भूमिका केली होती. मीताच्या भूमिकेत परिणीची चोप्रा आहे. चित्रपटात एक वेगळंच वळण येतं जेव्हा निखिल करिश्माची बहीण मीता हिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर कहाणीत खरा ट्विस्ट येतो. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रासह मनोज जोशी, शरत सक्सेना, टिनू आनंद यांसारख्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.