Join us
Daily Top 2Weekly Top 5

साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:35 IST

४४ व्या वर्षीही शाहिद कपूर इतका फिट कसा? रोज खातो फक्त 'हे'पदार्थ, अभिनेत्याचा फिटनेस प्लॅन माहितीये?

Shahid Kapoor Fitness:बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. इंडस्ट्रीत दोन दशकांहून अधिक काळ घालवलेल्या शाहिद कपूरने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘कबीर सिंग’ सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या शाहिदचे त्याच्या अभिनय आणि पडद्यावरच्या उत्तम अभिनयासाठी खूप कौतुक केलं जातं. लवकरच शाहिद त्याचा आगामी ओ रोमियो... चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच फिटनेसचीही तितकीच चर्चा होताना दिसते.

वयाच्या ४४ वर्षीही शाहिदचा फिटनेस थक्क करणारा आहे. शाहिद कपूरचा दिनचर्या आणि डाएट प्लॅन नेमका काय आहे, ज्यामुळे तो इतका फिट राहतो? याचा खुलासा त्याने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितलं की तो कोणताही फॅन्सी डाएट फॉलो करत नाही. दररोज व्यायाम करणे आणि त्यामधील सातत्य हेच त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य असल्याचं त्याने म्हटलं आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर शाहिद आधी काही विशिष्ट श्वासनाचे व्यायाम करतो. ज्यामुळे मन शांत होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणं तो पसंत करतो. कारण, त्यामुळे दिवसभर त्याला एनर्जेटिक राहायला आवडतं.

शाहिद त्याच्या फिटनेससोबत झोपेलाही तितकंच प्राधान्य देतो. कामाच्या व्यग्र वेळेतून सुद्धा तो कायम ६ तास तरी झोप घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे त्याला फ्रेश राहण्यास मदत मिळते. 

काय आहे अभिनेत्याचा डाएट प्लॅन...

शाहिद कपूरच्या आहाराबद्दल बोलायचं झालं तर तो पूर्णपणे शाकाहारी आहे. या मुलाखतीत त्याने म्हटलं की, तो हिरव्या भाज्या, डाळ तसेच हलकं आणि साधं जेवण त्याला आवडतं. शिवाय जास्त डाएट फॉलो करणं त्याला आवडत नाही. 'कधी कधी मी माझ्या आवडीचे पदार्थ देखील खातो. हे देखील गरजेचं असतं.'असं शाहिदने यावेळी सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shahid Kapoor's fitness mantra: Simple food, exercise, and adequate sleep.

Web Summary : Shahid Kapoor, 44, stays fit with simple vegetarian food, regular exercise, and prioritizing sleep. He avoids strict diets, focusing on consistency and mindful breathing for a balanced lifestyle.
टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीफिटनेस टिप्स