Tere Naam Movie Re-release: गेल्या काही वर्षात जुन्या चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातात. अशातच बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव तेरे नाव. व्हेलेंटाईन वीकचे औचित्य साधत हा कल्ट क्लासिक सिनेमा जवळपास २३ वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये रि-रिलीज करण्यात येणार आहे.त्यामुळे आता सिनेरसिक प्रचंड उत्सुक झाले आहेत.
२००३ साली आलेला 'तेरे नाम' हा सलमान खानच्या करिअरमधील गाजलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. या चित्रपटामुळे सलमान खऱ्या अर्थानं बॉलिवूडमधील सुपरस्टार झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटात सलमान खानने राधे भैय्या नावाची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री भूमिका चावला त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. प्रेमकहाणीवर आधारित हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळेस २५ कोटींपेक्षा अधिक कमाई करत विक्रम रचला होता. मीडिया रिपोर्टनुसार, आता २३ वर्षानंतर हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आणखी दोन चित्रपटही होणार रि-रिलीज
तेरे नाम सोबतच व्हेलेंटाईन वीकमध्ये आणखी दोन गाजलेले सिनेमे रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे चित्रपट म्हणजे 'देवदास' आणि 'युवा' आहेत. २००२ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय स्टारर देवदास हा चित्रपट ६ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २४ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Salman Khan's iconic film 'Tere Naam' is set to re-release in theaters on February 27, 2026, after 23 years, coinciding with Valentine's week. Alongside, 'Devdas' and 'Yuva' will also be re-released, offering a nostalgic cinematic experience.
Web Summary : सलमान खान की आइकोनिक फिल्म 'तेरे नाम' वैलेंटाइन वीक के मौके पर 23 साल बाद 27 फरवरी, 2026 को सिनेमाघरों में फिर से रिलीज होने के लिए तैयार है। इसके साथ ही 'देवदास' और 'युवा' भी फिर से रिलीज होंगी, जो एक पुरानी सिनेमाई अनुभव प्रदान करेंगी।