Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिला गर्भपात झाला अन्...; रणदीप हुड्डाच्या पत्नीने सांगितला 'तो' दु:खद अनुभव, भावुक होत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:55 IST

"त्या काळाने आम्हाला...", दुसऱ्यांदा आई होणार बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी, गमावलेलं पहिलं बाळ, भावुक होत म्हणाली...

Randeep Hooda Wife Lin Laishram: यंदाच्या वर्षात बॉलिवूड इंडस्ट्रातील अभिनेता विकी कौशल- कतरिना कैफ तसेच परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा या सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यानंतर अलिकडेच अभिनेता रणदीप हुड्डानेही चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली. रणदीप हुड्डाच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. लवकरच अभिनेता बाबा होणार आहे. त्याची पत्नी लिन लैशराम गरोदर आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर हे कपल त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. मात्र, मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना हा आनंदाचा दिवस बघायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीप हुड्डाची पत्नी लिन लैशरामने तिच्या गर्भपाताबद्दल सांगितलं. 

'ई-टाईम्स'सोबत संवाद साधताना लिन लैशराम भावुक झाली. तिच्या आयुष्यातील त्या कठीण टप्प्याबद्दल बोलताना तिला अश्रू अनावर झाले. यापूर्वी तिचा गर्भपात झाला होता. 'मी अजूनही ते दुःख विसलेले नाही', असं तिने या मुलाखतीत म्हटलं. यानंतर ती आणि रणदीप दोघेही भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते. तो त्यांच्यासाठी खूप कठीण काळ होता. यावेळी लिन लैशराम म्हणाली, "त्या काळाने आम्हाला खूप काही शिकवलं, कारण त्यामुळे आम्ही अधिक मजबूत झालो.आम्हाला आशा आहे की आता सर्व काही ठीक होईल. ही प्रेग्नंसी आमच्यासाठी एका मौल्यवान गिफ्टपेक्षा कमी नाही."

या मुलाखतीत लिनने तिच्या गर्भधारणेबद्दल रणदीप हुडाची प्रतिक्रिया आणि या संपूर्ण प्रवासात त्याची किती साथ मिळाली, याबद्दलही सांगिलतं. पुढे ती म्हणाली, "तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे! हे समजायला आम्हाला दोघांना थोडा वेळ लागला, पण हा प्रवास खूप छान आहे. तो स्वतः तयारी करत आहेत, तो मला पाठिंबा देत आहेत आणि मला जे काही लागेल, त्या-त्या ठिकाणी तो माझ्यासोबत आहे.रणदीप इतर सर्व गोष्टींपेक्षा आम्हाला प्राधान्य देत आहे. त्याला या भूमिकेत पाहून खूप छान वाटत आहे." असा खुलासा अभिनेत्याच्या पत्नीने केला. 

रणदीप आणि लीन या जोडीबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी २०२३ मध्ये लग्न केलं होतं. रणदीप आणि लीन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती मॉडेल, अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Randeep Hooda's Wife Lin Laishram Shares Heartbreak of Miscarriage

Web Summary : Lin Laishram, Randeep Hooda's wife, revealed the pain of a past miscarriage, highlighting the emotional toll on them both. She expressed gratitude for their current pregnancy, calling it a precious gift. Randeep's support has been unwavering throughout the journey.
टॅग्स :रणदीप हुडाबॉलिवूडसेलिब्रिटी