Join us

ठरलं! रणबीर कपूरचा 'धूम-४' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:24 IST

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या दमदार अभिनयासह विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Dhoom 4 Update :बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या दमदार अभिनयासह विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सध्या रणबीर त्याचे आगामी चित्रपट 'लव्ह अॅंड वॉर' आणि 'रामायण'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या बहुचर्चित चित्रपटांनंतर तो लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅनिमल आणि ब्रम्हास्त्र या चित्रपटांनंतर त्याच्याकडे बड्या प्रोजेक्ट ऑफर आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'धूम ४. त्यात आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे सिनेमाप्रेमींचा उत्साह द्विगुणीत होईल.

अ‍ॅक्शन सीन्सने परिपूर्ण असलेल्या 'धूम' चित्रपटाच्या तिन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. चाहते गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या चौथ्या भागाची वाट पाहत आहेत आणि त्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'धूम ४' ची पटकथेचं काम पूर्ण झालं आहे. श्रीधर राघवन यांनी त्याच्या पटकथेवर काम केलं आहे आणि आदित्य चोप्रा यांनी लेखन केलं आहे.आदित्य चोपडा यांच्या  'धूम ४' चं शूट पुढील वर्षी, म्हणजे एप्रिल २०२६ मध्ये सुरू होणार आहे.

दरम्यान, धूम चित्रपट प्रत्येक भाग प्रचंड गाजला. या चित्रपटाचा 'धूम' चित्रपटाच्या या सीरिजमधील प्रत्येक चित्रपट तुफान गाजला आहे. 'धूम' च्या पहिल्या भागात खलनायक म्हणून जॉन अब्राहम झळकला होता. तर धूम २ मध्ये हृतिक रोशनने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच ‘धूम ३’ मध्ये बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चोराची भूमिका साकारताना दिसला. त्यामुळे ‘धूम ४’ मध्ये रणबीर कपूरची वर्णी लागली आहे. हा चित्रपट येत्या २०२७ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडसिनेमा