Rajpal Yadav: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) मागील दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.तिहार तुरुंगात सरेंडर केलेल्या अभिनेत्याला काही दिवसांपूर्वी अटी-शर्थींसह अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.आर्थिक अडचणीत अडकलेल्या अभिनेत्याच्या मदतीसाठी बॉलिवूड कलाकार धावून आले. राजपाल यादवला १६ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता, परंतु कागदपत्रे पूर्ण होण्यास वेळ लागला,त्यामुळे अभिनेत्याची १७ तारेखला तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने प्रथम त्याच्या चाहत्यांचे आणि चाहत्यांचे आणि मदत करणाऱ्यांचे आभार मानले. आता, अभिनेता हळूहळू या काळात घडलेल्या विविध घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
राजपाल यादव तिहार जेलमध्ये असताना नवाजुद्दीन सिद्दीकीचा जुना व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला. ज्यामध्ये नवाज त्यांच्या संघर्षाच्या काळात राजपाल यादवने मदतीचा हात पुढे केला होता. त्यादरम्यान, अगदी जेवणापासून ते राहण्याची व्यवस्था देखील राजपालने केली होती. असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसले.
अशातच अलिकडेच राजपाल यादवने यूपी तक सोबत संवाद साधताना नवाजुद्दीन सिद्दीकीच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी अभिनेता म्हणाला,"तो माझ्या घरी जेवत नव्हता. तर ते त्याचं घर होतं. शिवाय त्याच्या घरी मीच जेवायचो.त्याच्यामुळे मला नोकरी मिळाली, त्याचे आभार." अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जे होतं ते त्याचंच होतं...
त्यानंतर अभिनेता म्हणाला," तिथे वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले १०-१५ कलाकार होते, पण कोणाकडे काम होतं तर किंवा कोणाकडे नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे सर्वजण दररोज संध्याकाळी एकत्र जेवायचे आणि गप्पा मारायचे. नवाजुद्दीनं या सगळ्याचं श्रेय मला दिलं हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे." अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.
दरम्यान,राजपाल यादवला १७ फेब्रुवारी रोजी अंतरिम जामिनावर सोडण्यात आलं आहे. त्यानंतर तो त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहिला. आता, राजपाल त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.
Web Summary : Rajpal Yadav addressed Nawazuddin Siddiqui's statement about his help during struggles. Yadav clarified it was a shared space, downplaying his role and expressing gratitude for the opportunity Nawaz gave him.
Web Summary : राजपाल यादव ने नवाजुद्दीन सिद्दीकी के संघर्ष के दौरान मदद करने वाले बयान पर प्रतिक्रिया दी। यादव ने स्पष्ट किया कि वह एक साझा स्थान था, अपनी भूमिका को कम करते हुए नवाज द्वारा दिए गए अवसर के लिए आभार व्यक्त किया।