Paresh Rawal On Hera Pheri 3: बॉलिवूडमध्ये काही असे चित्रपट आहेत, ज्यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. त्यापैकी एक नाव हेरा फेरी. राजू,श्याम आणि बाबू भैय्या हे त्रिकूट असलेल्या या चित्रपटाच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र,हेरा फेरी ३ ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.
मध्यंतरी अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. त्यानंतर चित्रपटाचे लेखक रोहन शंकर देखील या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आहेत. इतकंच नाही कायदेशीर वादामुळे देखील हा सिनेमा चर्चेत राहिला आहे. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शनास उशीर होतोय का? अशा अनेक चर्चा सुरु झाल्या. आता या सगळ्या मुद्द्यांवर परेश रावल यांनी भाष्य केलं आहे.अलिकडेच मनी कंट्रोलशी बोलताना परेश रावल म्हणाले, "कोणत्याही अफवांवर विश्वासठेवू नका. हेरा फेरी ३ येत आहे. मी लवकरच त्याचं शूटिंग सुरू करणार आहे." असं म्हणत परेश रावल यांनी चित्रपटाच्या बाबतीत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
हेरा फेरी सिनेमाचा पहिला भाग २००० साली, तर दुसरा भाग २००६ साली प्रदर्शित झाला होता. दोन्ही भाग प्रचंड यशस्वी ठरले होते. आता चाहते तिसऱ्या भागाबद्दलही उत्सुक आहेत. दरम्यान,'हेरा फेरी ३'ची घोषणा गेल्या वर्षी झाली होती आणि तेव्हापासून तो चर्चेत आहे.
Web Summary : Amidst rumors of delays and exits, Paresh Rawal confirms 'Hera Pheri 3' is happening and he will begin shooting soon. The film, facing legal issues and writer changes, is highly anticipated after the success of its previous installments in 2000 and 2006.
Web Summary : देरी और कलाकारों के निकलने की अफवाहों के बीच, परेश रावल ने पुष्टि की कि 'हेरा फेरी 3' बन रही है और वह जल्द ही शूटिंग शुरू करेंगे। कानूनी मुद्दों और लेखक परिवर्तनों का सामना कर रही यह फिल्म 2000 और 2006 में पिछली किश्तों की सफलता के बाद बहुत प्रतीक्षित है।