Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सेटवर शिवीगाळ करुन कलाकारांचा अपमान करायची.."; अभिनेत्याचे पूजा भटवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:09 IST

पूजा भटवर बॉलिवूडमधील कलाकाराने गंभीर आरोप केले आहेत. पूजा सेटवर शिवीगाळ करायची, कलाकारांना वाईट वागणूक द्यायची, असे थेट आरोप केले आहेत.

अभिनेत्री पूजा भट ही मनोरंजन विश्वात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पूजाला आपण सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय बिग बॉस ओटीटीमध्येही पूजा आपल्याला दिसली होती. पूजाचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं आहे. अशातच अभिनेता आणि मॉडेल मुजम्मिल इब्राहिमने पूजावर आरोप केले आहेत. याशिवाय पूजामुळे मला डिप्रेशनचा सामना करावा लागला, असंही मुजम्मिल म्हणाला आहे. काय म्हणाला मुजम्मिल, जाणून घ्या

सेटवर शिवीगाळ करायची, लोकांना ओरडायची पूजा

सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत मुजम्मिलने पूजा भटवर गंभीर आरोप केले. अभिनेता म्हणाला की, "पूजा सेटवर शिवीगाळ करायची. यामुळे काम करणं मला कठीण झालं होतं. त्यामुळे नंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. अभिनेत्यांसोबत पूजाचं वागणं अपमानास्पद असायचं. महेश भट्ट यांचा मी लाडका होतो परंतु पूजा माझ्याविरुद्ध अनेक गोष्टी बोलली. मी तिचा खूप आदर करायचो परंतु तिचं वागणं आक्रमक असायचं. ती खूप शिव्या द्यायची." 

"धोखा सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मला अनेक गोष्ट सहन कराव्या लागल्या. मला खूप त्रास व्हायचा आणि त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो. मला वाईट स्वप्न पडायची. मी देवाकडे प्रार्थना करायचो की, मला तिच्यापासून वाचव. मी तिचा आदर करायचो पण जेव्हा तुम्ही एका मुलाला काहीतरी वेगळंच सांगून भरकटवत आहात, तर तुम्ही काय अपेक्षा करणार. महेश भट यांनीही पूजाला याविषयी सांगितलं. पण भट साहेब नसतानाच पूजा माझ्याशी वाईट वागायची. याच भीतीमुळे मी राज २ ची ऑफर नाकारली." 

"पूजा दुसऱ्या अभिनेत्यांना अक्षरक्षः कुत्र्याप्रमाणे वागणूक द्यायची,  जसं की जॉन आणि डिनो. ती जेव्हा उठ म्हणायची तेव्हा आम्ही उठायचो आणि बस म्हणायची तेव्हा बसायचो. सहकलाकारांना अशी वागणूक देणारी व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल, याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मी कधीच एखाद्या व्यक्तीला अशी वागणूक देताना बघितलं नाही."  असा खुलासा मुजम्मिलने केला. 

टॅग्स :पूजा भटटेलिव्हिजनमहेश भटजॉन अब्राहमडिनो मोरिया