Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांना धक्का! 'भागम भाग' सिनेमाच्या सीक्वलमधून गोविंदाचा पत्ता कट; 'या' अभिनेत्याने केलं रिप्लेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:42 IST

'भागम भाग २' मधून गोविंदाचा पत्ता कट? चित्रपटात या अभिनेत्याची लागली वर्णी, चर्चांना उधाण 

Bhagam Bhag 2 Update: हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक सिनेमे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे खास आणि जुने चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. यापैकी एक चित्रपट म्हणजे भागम भाग. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साल २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. त्यात आता या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेक सिनेरसिक उत्सुक आहेत.मात्र,अशातच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली.ज्यामुळे प्रेक्षक नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

जवळपास १८ वर्षानंतर भागम भाग सिनेमाचा सीक्वल येणार आहे. मात्र, आता चित्रपटाच्या कास्टिंगबाबत मोठी अपडेट मिळते आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटातून अभिनेता गोविंदाचा पत्ता कट झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेता गोविंदाने भागम भागच्या पहिल्या भागात आपल्या अभिनयाने चार चांद लावले होते. त्यामुळे  या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही तो दिसणार असं चाहत्यांना वाटत होतं. परंतु, चाहत्यांच्या या आशेवर पाणी फिरलं आहे.

व्हरायटी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,  'भागम भाग'च्या सीक्वलमध्ये अभिनेता मनोज वाजपेयीला एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गोविंदाला रिप्लेस करत अभिनेत्याची चित्रपटात वर्णी लागली आहे. माहितीनुसार, हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा  राज शांडिल्य यांच्या खांद्यावर आहे.तर यात अभिनेत्री मीनाक्षी चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 

दरम्यान, 'भागम भाग २' मधील गोविंदाच्या रिप्लेसमेंटच्या वृत्तांवर निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. चित्रपटातील या कास्टिंगमधील बदलामुळे गोविंदाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda out! Manoj Bajpayee replaces him in 'Bhagam Bhag 2'.

Web Summary : 'Bhagam Bhag 2' replaces Govinda with Manoj Bajpayee. Meenakshi Chaudhary stars; Raj Shandilya directs. Fans express disappointment over Govinda's absence.
टॅग्स :मनोज वाजपेयीगोविंदाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा