Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यनच्या 'नागजिला' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे, आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:28 IST

कार्तिक आर्यनचा हा चित्रपट आधी १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात येणार आहे

धर्मा प्रॉडक्शन आणि महावीर जैन फिल्म्स निर्मित 'नागजिला' या फँटसी-कॉमेडी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, नवीन तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट आधी १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

निर्मात्यांनी हा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, आता तो व्हॅलेंटाईन डे विकेंडच्या निमित्ताने १२ फेब्रुवारी २०२७ रोजी प्रदर्शित केला जाईल. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित 'नागजिला' हा व्हिज्युअल इफेक्ट्सने (VFX) परिपूर्ण असलेला चित्रपट असून यामध्ये कार्तिक आर्यन स्वतःचं रूप बदलणाऱ्या एका 'नागा'ची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि चित्रपट निर्माते करण जोहर यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे या चित्रपटाची आधीच मोठी चर्चा आहे. आता व्हॅलेंटाईन डेच्या काळात प्रदर्शित होणार असल्याने, फँटसी, कॉमेडी आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच प्रतिसाद देतील, अशी निर्मात्यांना आशा आहे.

'नागजिला' हा चित्रपट पुढे ढकलल्यामुळे बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या 'लाहोर १९४७' सोबत आता चित्रपटाची टक्कर होणार नाही. राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शनची निर्मिती असलेला 'लाहोर १९४७' हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'नागजिला'चे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा हे 'फुकरे' फ्रेंचाइजीसाठी ओळखले जातात. या चित्रपटात कार्तिकसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रीती मुकुंदन मुख्य भूमिकेत आहे.

कार्तिक आर्यन सध्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यग्र आहे. तो शिमित अमीन यांच्या 'कॅप्टन इंडिया'वरही काम सुरू करणार आहे. कार्तिकच्या आगामी चित्रपटांच्या यादीत अनुराग बसू यांचा एका लव्ह स्टोरीचाही समावेश आहे, ज्यात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रीलीला दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'तू मेरी जिंदगी है' असे ठेवण्यात आले असून, तो या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kartik Aaryan's 'Naagila' release date postponed; new date announced.

Web Summary : Kartik Aaryan's fantasy-comedy 'Naagila' release is now February 12, 2027, moved from August 14, 2026. Kartik plays a shape-shifting 'Naga'. The film avoids clashing with Sunny Deol's 'Lahore 1947'. He's also filming 'Captain India' and a love story, 'Tu Meri Zindagi Hai'.
टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडकरण जोहर