John Abraham: उत्कृष्ट शरीरयष्टीमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाणार्या मोजक्या कलावंतांपैकी एक म्हणजे जॉन अब्राहम.जॉन अभिनेता व निर्माता बनण्याआधी मॉडेल म्हणून ओळखला जायचा. अनेक कंपन्यांच्या जाहिराती केल्यानंतर ज़ॉन अभिनयाकडे वळला आणि ‘जिस्म’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.त्यानंतर'साया','पाप और लकीर','फॉरबिडन लाइन्स' या 'दोस्ताना', 'शूट आऊट अॅट वडाळा'चित्रपटातून भूमिका केल्यानंतर धूम या चित्रपटात त्याने निगेटीव्ह भूमिका साकारली. यातील भूमिकेने त्याला अभिनेता म्हणून ओळख दिली.
सध्याच्या घडीला जॉन अब्राहम प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. परंतु,त्याला हा पल्ला गाठण्यासाठी खूप काही सहन करावं लागलं आहे. अलिकडेच, अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. स्क्रीन मास्टरक्लासला दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहम म्हणाला की जेव्हा त्याने २००३ मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला तेव्हा त्या वेळी इंडस्ट्रीत आउटसाईडर्स खूप कमी होते.अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तो इंडस्ट्रीत स्थिरावला.
या सेशनदरम्यान, अभिनेता म्हणाला,"माझ्या कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून कदाचित सर्वात जास्त टीका कोणावरी झाली असेल तर तो मी असेन. मी २००३ साली या क्षेत्रात आलो.नव्हते. फक्त शाहरुख खान आणि अक्षय कुमार इंडस्ट्रीत तेव्हा कोणीही बाहेरुन आलेले नव्हते.पण, त्यावेळी मला ज्या प्रकारची ट्रोलिंग सहन करावी लागली ती इतर कोणालाही सहन करावी लागली नाही. माझ्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. मी फक्त भविष्याचा विचार केला शिवाय माझ्या जास्त अपेक्षाही नव्हत्या.मी कधीचं स्वत चं प्रमोशन केलं नाही. मी माध्यमांमध्येही फारसा चर्चेत नसतो. पण कदाचित लोकांना माझा प्रामाणिकपणा भावला."
यापुढे मुलाखतीत जॉन म्हणाला,"इतर सहकलाकारांसोबत काम केल्याने मी अधिक चांगलं काम करू शकलो. मी अक्षय कुमार, शाहरुख खान, वरुण धवन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबतही काम केलं आहे. ते नेहमीच मला एकमेकांचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न करतात.मी कोणासोबतही काम करत असलो तरीही आमच्यात स्पर्धा कधीच नसते. मी खूप सहजतेने काम करतो आणि तेच चित्रपटांमध्ये दिसतं."असा खुलासा अभिनेत्याने यावेळी केला.
Web Summary : John Abraham recalls facing criticism as an outsider in Bollywood. He acknowledges Shah Rukh and Akshay's success, highlighting his own challenging journey and appreciation for supportive co-stars.
Web Summary : जॉन अब्राहम ने बॉलीवुड में एक बाहरी व्यक्ति के रूप में आलोचना का सामना करने को याद किया। उन्होंने शाहरुख और अक्षय की सफलता को स्वीकार करते हुए अपनी चुनौतीपूर्ण यात्रा और सहायक सह-कलाकारों के लिए प्रशंसा व्यक्त की।