२००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा सिनेमा कोणत्याही चित्रपटप्रेमीला विसरणं शक्य नाही. २५ वर्षापूर्वी रिलीज झालेला हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. सनी देओलची (Sunny Deol) मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमातील संवाद, गाणी, सीन सगळं काही तुफान गाजलं. विशेष म्हणजे या सिनेमाने सनी देओलला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मात्र, सनी देओलपूर्वी या सिनेमाची ऑफर अभिनेता गोविंदाला मिळाली होती. परंतु, एका कारणाने गोविंदाने (Govinda) हा सिनेमा नाकारला आणि तोच सिनेमा सुपरहिट झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'गदर' सिनेमाची पहिली ऑफर ही गोविंदाला देण्यात आली होती. परंतु, त्याने काही कारणास्तव हा सिनेमा करण्यास नकार दिला. एका टीव्ही शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. या सेटवर गदरविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतांना त्याने हा सिनेमा का नाकारला त्याचं कारण सांगितलं.
ज्यावेळी गोविंदाला गदरची ऑफर मिळाली. त्यावेळी त्याला सिनेमातील काही सीन हे वादग्रस्त वाटले. या सीन्समुळे त्याने चित्रपटाला नकार दिला. गोविंदाने नकार दिला नंतर सनी देओलला तारासिंगची भूमिका ऑफर करण्यात आली. आणि, सनीने या सिनेमासाठी होकार दिला.
दरम्यान, 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाने बॉलिवूड इंडस्ट्रीत इतिहास रचला. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel) यांची मुख्य भूमिका आहे. प्रेम, देशभक्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. २०२३ मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Web Summary : Govinda initially rejected the 'Gadar' role due to controversial scenes. Sunny Deol then accepted, making the film a massive hit. The sequel also released in 2023.
Web Summary : गोविंदा ने विवादास्पद दृश्यों के कारण शुरू में 'गदर' की भूमिका ठुकरा दी। बाद में सनी देओल ने स्वीकार कर लिया, जिससे फिल्म एक बड़ी हिट बन गई। सीक्वल 2023 में भी रिलीज़ हुआ।