सुपरस्टार गोविंदाला ओळखत नाही असा एकही सिनेरसिक आढळणार नाही. कॉमेडी सिनेमांमधून गोविंदाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही गोविंदा बॉलिवूडमध्ये चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी पायाला गोळी लागल्याने गोविंदाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यातून गोविंदा चांगलाच सावरला आहे. आता गोविंदाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. गोविंदाची पुढची पिढी म्हणजेच अभिनेत्याचा मुलगा यशवर्धन आता बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
गोविंदाचा मुलगा या बॉलिवूड सिनेमात झळकणार
२०२५ मध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा सिल्वर स्क्रीनवर दिसणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून यशवर्धन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक साई राजेश यांच्या आगामी रोमँटिक सिनेमात गोविंदाचा लेक यशवर्धन काम करणार आहे. सध्या सिनेमासाठी ऑडिशन सुरु असून यशवर्धनसोबत कोणती हिरोईन झळकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
या सिनेमासाठी नवोदित अभिनेत्रीचा मेकर्स शोध घेत आहेत. आतापर्यंत १४ हजार मुलींची यासाठी ऑडिशन घेण्यात आलीय. सर्व काही फायनल झालं तर २०२५ मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात आहे. गोविंदाचं मुलाच्या करिअरसाठी नक्कीच खास मार्गदर्शन असेल यात शंका नाही. यशवर्धन आता बॉलिवूडमध्ये कशी चमक दाखवतो, हे येणाऱ्या काळात प्रेक्षकांना कळून येईलच..