Ranveer Singh: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर काल १९ मार्चला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे.पहिल्या भागाप्रमाणे अभिनेता रणवीर सिंग या सीक्वलमध्ये भाव खाऊन गेला आहे. सध्या सगळीकडेच या सिनेमासह त्यातील कलाकारांच्या अभिनयाचं देखील कौतुक होताना दिसतंय. चित्रपटातील रणवीरचा फिटनेस सुद्धा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. रणवीर सिंगने 'धुरंधर-२' साठी केवळ आपला लूक बदलला नाहीतर त्याने शरीरावर देखील तितकीच मेहनत घेतल्याचं दिसतंय. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर लोक रणवीरचं वर्कआउट आणि डाएट प्लॅन जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, या भूमिकेसाठी रणवीरने सुमारे १५ किलो वजन वाढवले आणि नंतर तेवढंच वजन कमी केलं. त्यासाठी त्याने हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंग,प्रोटिनयुक्त आहार अशी दिनश्चर्या फॉलो केल्याचं सांगितलं जातंय. तसंच अभिनेत्याने मसल गेन करत आणि चरबी कमी करण्यावर अधिक भर दिला. यासाठी त्याची मेहनत आणि चांगला आहार देखील महत्वाचा ठरला. रणवीर सिंगचा ट्रेनर, लॉईड स्टीव्हन्सने एका मुलाखतीत त्याच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. त्याच्या संपूर्ण वर्कआउट रूटीनमध्ये वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजवर लक्ष केंद्रित केलं गेलं, असं त्याने सांगितलं.
'असा' होता अभिनेत्याचा डाएट प्लॅन...
रणवीरच्या डाएटबद्दल बोलायचं झालं तर, मिळालेल्या माहितीनुसार रणवीर त्याच्या आहाराकडे काटेकोरपणे लक्ष देतो. हाय प्रोटिन्स आणि कमी-कार्बोहायड्रेट्स असलेला आहार तो घेतो. धुरंदर- २ च्या शूटिंगवेळी तो दर तीन तासांनी तो वेळ मिळेल तसा थोडं थोडं जेवत असे. तो जंक फूड, अतिरिक्त साखर किंवा अति खाणे टाळत असे. याशिवाय अभिनेता सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि लिंबू पाणी प्यायचा. त्याचबरोबर हलकासा स्ट्रेचिंगचा व्यायाम पण करायचा. रणवीरने नाश्त्यामध्ये ओट्स, सुकामेवा, चॉकलेट चिप्स, इम्युनिटी शॉट्स, डिटॉक्स ज्यूस, शिलाजीत आणि अश्वगंधा,खजूर यांचा समावेश केला होता. शिवाय रात्रीच्या जेवणात तो हलकं, प्रथिनयुक्त पदार्थ खाणं पसंत करायचा.
Web Summary : For 'Dhurandar 2,' Ranveer Singh gained and lost 15kg, focusing on strength training and protein. His trainer revealed a diet rich in protein, low in carbs, and small meals every three hours, alongside avoiding junk food and sugar.
Web Summary : 'धुरंधर 2' के लिए, रणवीर सिंह ने 15 किलो वजन बढ़ाया और घटाया, ताकत प्रशिक्षण और प्रोटीन पर ध्यान केंद्रित किया। उनके ट्रेनर ने प्रोटीन से भरपूर, कार्ब्स में कम और हर तीन घंटे में छोटे भोजन के साथ जंक फूड और चीनी से परहेज करने का खुलासा किया।