Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: अंघोळ कशी करावी? अक्षय खन्नाच्या भावाने शेअर केला १५ मिनिटांचा बाथरुम व्हिडीओ, चाहते बघतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:40 IST

अक्षय खन्नाच्या भावाने बाथरुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अक्षयचा भाऊही अभिनेता आहे

'धुरंधर' सिनेमात रहमान डकैत हे पात्र साकारुन प्रेक्षकांमध्ये चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना.अक्षय खन्नाला भाऊ असून तो सुद्धा अभिनेता आहे. त्याचं नाव राहुल खन्ना. राहुलने बॉलिवूडमध्ये फार कमी सिनेमात काम केलं असलं तरीही तो सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात आहे. अशातच राहुलचा एक व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल झाला आहे. राहुलने चक्क १५ मिनिटांचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

बाथरूममधून १५ मिनिटांचे 'लाईव्ह'

राहुल खन्नाने नुकतेच यूट्यूबवर 'Art of Taking a Shower' नावाचे एक चॅनेल सुरू केले आहे. या नवीन चॅनलची सुरुवात त्याने कोणत्याही साध्या व्हिडिओने नाही, तर थेट एका लाईव्ह स्ट्रीमने केली. 'राहुल खन्ना शॉवर रिचुअल' (Rahul Khanna Shower Ritual) असं टायटल असलेल्या या १५ मिनिटांच्या लाईव्ह सेशनमध्ये त्याने अंघोळ करण्यापासून ते दाढी करण्यापर्यंत सर्वकाही दाखवलं.

अवघ्या २४ तासांत या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अवघे १०४ सबस्क्रायबर्स असतानाही हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून, राहुलने याची एक छोटी झलक इंस्टाग्रामवरही शेअर केली आहे.

चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

राहुलच्या या बेधडक अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांची चर्चा सुरू झाली आहे. काहींना त्याचे हे वागणे आश्चर्यजनक वाटले असले, तरी त्याचे चाहते त्याच्या फिटनेसचे आणि लूकचे भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, "राहुलच्या हॉटनेसपुढे आजचे मोठे स्टार्स फिके पडतात," तर काहींना त्याच्यामध्ये त्याचे वडील विनोद खन्ना यांची झलक दिसत आहे. काहींनी याला 'पब्लिसिटी स्टंट' म्हटले आहे, तर काहींच्या मते राहुल नेहमीच बिनधास्त राहिला असल्याचं सांगितलं.

राहुल खन्नाची कारकीर्द

राहुल खन्नाने ग्लॅमरच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने १९९४ मध्ये 'एमटीवी एशिया'मध्ये व्हीजे (VJ) म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९९८ मध्ये दीपा मेहता यांच्या '१९४७ अर्थ' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरस्कार मिळाला. 'एलान', 'रकीब' आणि 'दिल कबड्डी' यांसारख्या चित्रपटांत त्याने काम केले आहे. रणबीर कपूरच्या 'वेक अप सिड'मधील त्याच्या छोट्या पण प्रभावी भूमिकेचे आजही कौतुक होते. याशिवाय राहुलने 'द अमेरिकन्स' सारख्या आंतरराष्ट्रीय टीव्ही सीरिजमध्येही काम केले असून सध्या तो एक 'स्टाईल आयकॉन' म्हणून ओळखला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Khanna's 15-minute bathroom video goes viral, fans react.

Web Summary : Actor Rahul Khanna's 15-minute shower video on YouTube sparks mixed reactions. Some admire his fitness, others see a publicity stunt. Khanna, known for roles in '1947 Earth' and 'Wake Up Sid', shares his 'shower ritual' with fans.
टॅग्स :अक्षय खन्नाबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार