Join us

"मला मूल नकोय, कारण...", बॉलिवूड अभिनेत्याचं पालकत्वाबद्दल मोठं वक्तव्य, ४९ व्या वर्षीही आहे सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:52 IST

बॉलिवूड अभिनेत्याचं पालकत्वाबद्दल मोठं वक्तव्य, ४९ वर्षीही आहे सिंगल; म्हणाला...

Abhay Deol: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभय देओलला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभयने अगदी मोजक्याच पण उत्तम चित्रपटांमधून काम केलं आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा','हॅप्पी भाग जाएगी' तसेच  ‘देव डी’,'रांझणा' या चित्रपटांमधून त्याने  दमदार भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्याचे चाहते देखील खूप आहेत. वयाच्या ४९ व्या वर्षी हा अभिनेता सिंगल आहे. सध्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.

अलिकडेच अभय देओलने जय मदान यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान,अभिनेत्याने आपण पालकत्वाचा विचार केला नसल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं.त्यावेळी अभय देओल म्हणाला, मला मूलं नको आहेत. पण मला आयुष्यात सेटल व्हायचं असेल तर मी मूलं जन्माला घालण्यापेक्षा त्यांना दत्तक घेईन."

यापुढे अभय देओल त्याचं कारण सांगत म्हणाला, " मी माझ्या आजुबाजूची परिस्थिती पाहतो तेव्हा मनात हाच विचार येतो मी मुल जन्माला का घालावं? माझ्या या निर्णयाचा मला पश्चाताप नाही. मात्र, या पृथ्वीवर वाढत्या लोकसंख्येचा भार आपण टाकू शकत नाही. त्यामुळे त्यात आणखी भर नको. जर मला मूल असतं तर कदाचित मी त्याच्यावर जास्त हक्क गाजवणारा आणि कंट्रोलिंग पालक बनलो असतो. कारण, माझा स्वभाव तसाच आहे. मला वाटत नाही की मी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकेन. आपण लहान असताना तेव्हाचं वातावरण खूप सुरक्षित होतं. पण, आता सगळंच बदललं आहे. त्यामुळे मला मुल नको. "असं मत त्याने मांडलं.

एका जुन्या मुलाखतीमध्ये अभय देओलने असंही सांगितलं होतं की, त्याला लग्न करायचं नाही.लग्न करुन दुखी राहण्यापेक्षा सिंगल राहणं पसंत करेन. असं तो म्हणाला होता. 

टॅग्स :अभय देओलबॉलिवूडसेलिब्रिटी