Join us

आमिरच्या व्याही मंडळींना पाहिलंय का? पहिल्यांदाच आयराच्या सासरची माणसं आली कॅमेरासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:10 IST

Aamir khan: नुपूर आणि आयरा ही जोडी मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान (aamir khan) याचं लवकरच प्रमोशन होणार आहे. पडद्यावर उत्तमरित्या अभिनयाची जबाबदारी पार पाडणारा आमिर आता सासरेबुवांची नवीन जबाबदारी पेलणार आहे. सध्या आमिरच्या घरी त्याच्या लेकीच्या लग्नाची गडबड सुरु आहे. आयराची मेहंदी सोहळा, हळदी समारंभ दण्यात पार पडत आहेत. यामध्येच आता आयराच्या सासरची मंडळी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले आहेत. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आयरा मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नाची गाठ बांधणार आहे. त्यामुळे या दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या पद्धतीने हा लग्नसोहळा होणार आहे. नुकताच आयराचं मेहंदी फंक्शन झालं आणि त्यानंतर हळदी सोहळादेखील. या हळदी सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. यात नुपूरच्या घरातले पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या कॅमेरासमोर आले.

विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता नऊवारी साडीत दिसून येत आहे. रिना हळदी फंक्शनसाठी नुपूरच्या घरी गेली होती. यावेळी नुपूरच्या घरातल्या मंडळींची झलक पाहायला मिळाली. नुपूरची आई, आत्या यांनी रिना दत्तासोबत कॅमरासमोर पोझ दिली.

दरम्यान,  आयरा खान आणि नुपूर शिखरे आज ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नानंतर आमिर खान मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन देणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडलग्नसेलिब्रिटी