Aamir Khan:बॉलिवूडसेलिब्रिटींपैकी काही सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता आमिर खान.बॉलिवूड सुपरस्टार, मिस्टर परफेक्शनिस्ट अशा उपाधिंनी ओळखला जाणारा, हजारो तरुणींच्या गळयातील ताईत असणारा हा नायकाचा जगभरात चाहतवर्ग आहे. 'राजा हिंदुस्तानी' मधील टॅक्सी ड्रायव्हर राजा ते 'तारे जमीन पर', 'लगान', 'सरफरोश', 'दिल ', 'कयामत से कयामत तक' आणि ,'पीके' ते'धूम 3' मधील अट्टल चोर अशा चित्रपटांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. आमिर खान त्याच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो.आजपर्यंत त्याने पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका जीवंत केली.
आमिर खानचे चित्रपटासंबंधित अनेक किस्से कानावर येत असतात. परंतु,तुम्हाला माहितीये का? आमिर खानने एका चित्रपटामध्ये आपली भूमिका सर्वोत्तम व्हावी यासाठी चक्क १०० पानं खाल्ली होती. हा सिनेमा म्हणजे पीके होय. दरम्यान, ‘PK’ सिनेमात आमिर खानची व्यक्तिरेखा कायम पान खाताना दाखवण्यात आली होती. एका मुलाखतीदरम्यान आमिरने सांगितले होते की, त्याला पान खाण्याची सवय नाही. पण, चित्रपटातील पात्राच्या गरजेनुसार त्याला भरपूर पान खावे लागले होते.
'पीके'तील त्या भूमिकेत जीवंतपणा यावा यासाठी आमिर दिवसातून १०० पान खायचा. इतकंच नाहीतर त्याच्यासाठी सेटवर एक पान विक्रेता नेहमी हजर असायचा. खरंतर आमिरला पान न खाताही तो सीन करता आला असता. पण आमिरला त्या दृश्याला वास्तिवक टच द्यायचा होता.पण अभिनेत्याला याची मोठी किंमत मोजावी लागली. सतत पान खाल्ल्याने आमिर खानच्या तोंडात फोड आले होते, ज्यामुळे त्याला बराच त्रास सहन करावा लागला होता.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'पीके' हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता.या चित्रपटात आमिरसह अनुष्का शर्मा, संजय दत्त, बोमन ईराणी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ११ वर्ष उलटली आहेत तरी त्याची क्रेझ अजूनही कायम आहे.
Web Summary : Aamir Khan, known for perfection, ate 100 betel leaves daily for his 'PK' role to add authenticity. This caused mouth sores, highlighting his dedication to acting.
Web Summary : परफेक्शन के लिए जाने जाने वाले आमिर खान ने 'पीके' में भूमिका को वास्तविक बनाने के लिए प्रतिदिन 100 पान खाए। इससे उनके मुंह में छाले हो गए, जो अभिनय के प्रति समर्पण को दर्शाता है।