Sitaare Zameen Par New Song: आर.एस प्रसन्ना दिग्दर्शित आणि आणि आमिर खान (Aamir Khan) प्रोडक्शन निर्मित सितारे जमीन पर हा चित्रपट २० जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अभिनेता आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. प्रेरणादायी आणि भावनिक कथानक असलेल्या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटातील शुभ मंगलम हे धमाल गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात आमिर खानसह जिनिलिया देशमुखचाकधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या अफलातून डान्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
'सितारे जमीन पर' सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर'चा हा सीक्वल आहे, असं म्हटलं जात आहे. अशातच या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटातील 'शुभ मंगलम' हे गाणं शंकर महादेवन आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी एकत्र गायलं आहे, तर त्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. सध्या या नव्या गाण्याला संगीतप्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, सितारे जमीन पर मध्ये आमिर खान, जिनिलिया सोबतच आरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भानसाली, आशीष पेंढसे, ऋषी शहाणी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर अशा कलाकारांची फौज आहे.