Join us

'तिच्या तोंडाच्या वासाने डोक्यात झिणझिण्या आल्या'; मनिषासोबत रोमॅण्टिक सीन करताना झाले होते बॉबीचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:38 IST

Bobby deol: मनिषासोबत रोमॅण्टिक सीन करताना बॉबीचे पूरते हाल झाले होते. पण, त्यानेही तिचा बदला घ्यायचं ठरवलं होतं.

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता बॉबी देओल (bobby deol) याच्या नावाचा बोलबाला आहे. animal या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळे त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच त्याचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्यासोबतच्या किसिंग सीनविषयी भाष्य केलं आहे.

१९९७ मध्ये रिलीज झालेला 'गुप्त' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल.  या सिनेमात बॉबी देओल, काजोल आणि मनिषा कोईराला हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या सिनेमात बॉबी आणि मनिषाचा एक किसिंग सीन होता. मात्र, हा सीन करताना बॉबी चांगलाच वैतागला होता. कारण, मनिषाच्या तोंडाला सतत कांद्याचा वास येत होता. हा किस्सा त्याने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला.

"माझं तिच्यासोबत चांगलं रिलेशन होतं पण आमच्यात कधी मैत्री झाली नाही. एकदा बेचैनिया या गाण्याचं शुटिंग सुरु होतं. या गाण्यातील एका सीनमध्ये तिला माझ्या चेहऱ्या नजीक यायचं होतं. पण, ती जशी ती माझ्या चेहऱ्याजवळ आली माझ्या डोक्यात झिणझिण्या आल्या. कारण, तिच्या तोंडाचा घाण वास येत होता", असं बॉबी देओल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "तिने या गाण्याच्या शूटपूर्वी कांदा आणि हिरवी चटणी खाल्ली होती. त्यामुळे हा रोमॅण्टिक सीन करतांना तिच्या तोंडातून कांद्याचा वास येत होता. हा सीन माझ्यासाठी प्रचंड अवघड झाला होता. कसाबसा करुन मी तो सीन पूर्ण केला."

दरम्यान, या सीनविषयी बॉबीने आणखी एक मजेदार किस्सा सांगितला. मनिषाला सुद्धा त्या त्रासाची जाणीव व्हावी. यासाठी त्याने सिनेमात मनिषाच्या भावाचा रोल करणाऱ्या अभिनेत्याला सांगितलं की तू सुद्धा तिच्यासोबत शूट करताना भरपूर कांदा खाऊन जा. ज्यामुळे ती सुद्धा त्या वासाने वैतागेल. पण, बॉबीचा हा प्लॅन त्याच्यावरच उलटला. कारण, मनिषाला काहीही फरक पडला नाही.

टॅग्स :बॉलिवूडबॉबी देओलमनिषा कोईरालासेलिब्रिटीकाजोल