Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:10 IST

मी मीडियासमोर बोलले आणि तो चिडला, काय म्हणाली बॉबी डार्लिंग?

अनेक हिंदी सिनेमांमध्ये दिसलेली ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग (Bobby Darling) सध्या चर्चेत आहे. एकेकाळी तिचं भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार क्रिकेटपटूसोबत अफेअर गाजलं होतं. तिने तशी कबुलीही दिली होती. आता नुकतंच तिने पुन्हा एका मुलाखतीत त्या स्टार क्रिकेटपटूसोबत नातं का तुटलं आणि तेव्हा नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला. कोण आहे तो क्रिकेटपटू आणि काय म्हणाली बॉबी डार्लिंग?

'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी डार्लिंग म्हणाली,"आमची नवीनच मैत्री झाली होती. आम्ही अशोका हॉटेलमध्ये एका क्लबमध्ये भेटलो होतो. नंतर बऱ्याचदा आम्ही क्लबिंग केलं, ड्रिंक्ससाठी भेटलो. लोकांनी कदाचित आम्हाला बघितलं. किंवा माझ्या तोंडून कधीतरी निघालं असेल की मी मुनाफ पटेलला (Munaf Patel) भेटले. आम्ही सोबत आहोत. लोकांनी बहुतेक चुकीचा अर्थ काढला असावा. कारण तेव्हा मी फ्लर्ट करते अशी माझी प्रतिमा झाली होती. आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो असं मी म्हणणार नाही. कारण माझ्या बाजूने काही फीलिंग्स होत्या. आम्ही भेटायचो आणि दोन जण तेव्हाच भेटतात जेव्हा आकर्षण असतं. आकर्षण होतं, मग आपण प्रेमात पडतो."

ती पुढे म्हणाली, "प्रेम तर होतं पण काय बोलू कदाचित ते वन नाईट स्टँडवरच थांबलं. मी मीडियामध्ये मुलाखतीत माझं त्याच्यावर प्रेम आहे हे कबूल केलं. आहे तर आहे मान्य करणारच ना. पण याचा त्याला राग आला. त्याची क्रिकेट टीममध्ये बदनामी होईल, तू असं नव्हतं करायला पाहिजे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं तो म्हणाला. त्याने माझे फोन उचलणंही बंद केलं होतं."

२०११ साली झालेल्या विश्वचषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघातील महत्वाचा खेळाडू मुनाफ पटेलवर बॉबी डार्लिंगने आरोप लावले होते. तिचा वापर करुन विश्वासघात केल्याचा आरोप तिने लावला होता. त्यावर मुनाफने कायदेशीर कारवाई केली होती. त्याचे बॉबीसोबत संबंध नसल्याचं तो म्हणाला. मात्र बॉबीने आपल्याकडे पुरावे असल्याचं सांगितलं होतं. या सर्व घटनेचा मुनाफ पटेलच्या करिअरवर परिणाम झाला. २०१३ साली त्याला मुंबई इंडियन्स कडून शेवटचं खेळताना पाहिलं गेलं.

टॅग्स :मुनाफ पटेलसेलिब्रिटीबॉलिवूडभारतीय क्रिकेट संघ