Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : जया बच्चन यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:00 IST

जया बच्चन यांच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकीत

बॉलिवूडच्या अभिनेत्री जया बच्चन यांनी चार दशकांचा काळ गाजविला आहे. बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. पाठीवर रूळणारे लांबसडक केस आणि हसण्याचा एक वेगळा अंदाज यामुळे त्यांनी पे्रक्षकांना त्यांनी भुरळ घातली. १९७१ मध्ये जया बच्चन यांचा ‘गुड्डी’ हा सिनेमा हिट झाला आणि यानंतर एकामागून एक अनेक सिनेमे केले. पुढे त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. या इतक्या वर्षांत जया बच्चन यांच्यामध्ये प्रचंड बदल झाला.जया बच्चन यांचा पहिला चित्रपट बंगाली होता. या चित्रपटाचे नाव होते, ‘महानगर’. यावेळी जया केवळ १५ वर्षांच्या होत्या. ‘महानगर’नंतर जया बच्चन यांनी अनेक बंगाली चित्रपटांत काम केले. १९७१ मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव होते, ‘गुड्डी’. ‘गुड्डी’ सुपरडुपर हिट झाला आणि यानंतर जया मुंबईला शिफ्ट झाल्यात.

‘जवानी दिवानी’नंतर जया यांनी अनेक चित्रपटांत काम केले. यापैकी बहुतांश चित्रपट हिट झालेत. उपहार, पिया का घर, कोशीश, बावर्ची या चित्रपटांतील जया यांच्या लूकची प्रचंड चर्चा झाली. याशिवाय जंजीर, अभिमान, चुपके चुपके, शोले, सिलसिला, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, लागा चुनरी में दाग या सिनेमात काम केले.  २००८ मध्ये प्रदर्शित ‘द्रोणा’ या चित्रपटानंतर जया यांनी हळूहळू चित्रपट करणे थांबवले. २०१६ मध्ये ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटात त्या कॅमिओ रोलमध्ये अखेरच्या दिसल्या.

जया बच्चन यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी 2004 साली समाजवादी पार्टीतून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्या चार वेळा खासदार राहिल्या आहेत.

जया बच्चन यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जया बच्चन व त्यांचा नवरा अमिताभ बच्चन यांच्याकडे मिळून 10.01 अब्ज रुपयांची संपत्ती दाखवली होती. या शपथपत्रात जया बच्चन यांच्या नावावर बँक व विभिन्न वित्तीय संस्थांकडून 87कोटी 34 लाख 62 हजार 85 रुपयांचे कर्जही दाखवले होते. संपत्तीच्या बाबतीत अमिताभ बच्चन जयापेक्षा जास्त श्रीमंत आहे. जया बच्चन यांच्याकडे 67 कोटी 79 लाख 31 हजार 546 रुपयांची संपत्ती आहे.

तर जया बच्चन यांच्या हातात अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त पैसे असतात. शपथ पत्रानुसार जया बच्चन यांच्याकडे दोन लाख 33 हजार 973 रुपये हातात असल्याचे दाखवले होते. जया बच्चन यांच्याकडे 26 कोटी 10 लाख 99 हजार 543 रुपयांच्या किमतीची ज्वेलरी दाखवली होती. तसेच त्यांच्याकडे 8 लाख 85 हजार 612 किंमतीची वाहनेदेखील आहेत. त्यांच्या नावाने दुबईतील बँकेत सहा कोटी 59 लाख 35 हजार 374 रुपये जमा आहेत.

जया बच्चन यांच्याकडे दोन ठिकाणी शेतजमीन आहे. मध्यप्रदेशमीधील भोपाळमधील सेवनिया गावात 5 एकर जमीन आहे. लखनऊमधील काकोरी येथील गाव मुझफ्फरनगरमध्ये 1.22 हेक्टर शेतजमीन आहे. भोपाळमधील शेत जमीनीची किंमत 35 कोटी रुपये आहे तर काकोरीमधील शेत जमिनीची किंमत 25 लाख रुपये आहे.

टॅग्स :जया बच्चनअमिताभ बच्चन