Join us
Daily Top 2Weekly Top 5

Annu kapoor Birthday: प्रियंका चोप्राच्या त्या नकारानं भडकले होते अन्नू कपूर, वाचा ‘सात खून माफ’च्या सेटवरचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:18 IST

Annu kapoor Birthday: ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियंका चोप्रा लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात अन्नू कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटात प्रियंकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका अन्नू कपूर यांच्या वाट्याला आली होती.

Annu kapoor Birthday: 'अंताक्षरी' हा टीव्हीवरचा सर्वाधिक गाजलेला शो. या शोने प्रेक्षकांना जणू वेड लावलं होतं. अन्नू कपूर यांनी होस्ट केलेला हा शो तुफान गाजला होता. या शोमुळे अन्नू कपूर घराघरात पोहाेचले. आज अन्नू आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९८३ साली 'मंडी' या चित्रपटाद्वारे अन्नू कपूर यांनी आपल्या ॲक्टिंग करिअरची सुरूवात केली. पण त्यांना खरी ओळख दिली ती 'उत्सव' या सिनेमाने. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. अन्नू कपूर यांचं बालपण अतिशय हलाखीत गेलं. खरं तर त्यांना आयएएस बनायचं होतं. मात्र घरची परिस्थिती इतकी बिकट की, त्यामुळे आयएएस होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. सुरूवातीच्या दिवसांत चहाचा स्टॉल टाकला. लॉटरीची तिकिटं विकून त्यांनी दिवस काढले. आज अन्नू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सात खून माफ’ या चित्रपटाचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

प्रियंकाच्या नकार अन् अन्नू कपूर यांची नाराजी...होय,‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियंका चोप्रा लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात अन्नू कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटात प्रियंकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका अन्नू कपूर यांच्या वाट्याला आली होती. चित्रपटाच्या कथेनुसार प्रियंका व अन्नू कपूर यांच्यात काही इंटिमेट सीन्स शूट होणार होते. पण प्रियंकाने अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन करायला स्पष्ट नकार दिला. मग काय, तिच्या या नकाराने अन्नू कपूर चांगलेच भडकले होते. अन्नू कपूर माझे वडिल अशोक चोप्राचे मित्र आहेत. माझ्या वडिलांच्या मित्रासोबत मी इंटिमेट सीन देणार नाही, असं प्रियंकाने ‘सात खून माफ’ च्या मेकर्सला स्पष्ट सांगितलं. मात्र अन्नू कपूर तिचा हा नकार कदाचित पचवू शकले नाहीत. ‘मी सुंदर नाही, हिरोही नाही. मी सुंदर असतो तर तिने माझ्यासोबत इंटिमेट सीन केले असते. कारण तिला दुस-या हिरोसोबत इंटिमेट सीन करण्यास काहीही अडचण नाही. टॅलेंट वगळले तर सुंदर दिसणं हेच महत्त्वाचं आहे,’ अशा शब्दांत अन्नू कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अन्नू कपूर यांची ही प्रतिक्रिया प्रियंकासाठी चांगलीच शॉकिंग होती. पुढे एका मुलाखतीत प्रियंका यावर बोलली होती. ती म्हणाली होती, ‘मी सुंदर नाही, हिरो नाही,म्हणून ती माझ्यासोबत इंटिमेट सीन्स द्यायला तयार नाही, असं अन्नू कपूर म्हणाल्याचं मी वाचलं. त्यांच्यासोबतचे इंटिमेट सीन्स स्क्रिप्टमध्ये नव्हतेच. त्यांना इंटिमेट सीन्स करायचे असतील, तर त्यांनी तसे चित्रपट निवडावे. असं बोलणं अन्नू कपूर यांना शोभत नाही. त्यांच्या या शब्दांनी मी दुखावले जाऊ शकते, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी.’ यानंतर अनु कपूर यांनी आपण असं काही म्हटलंच नसल्याचं सांगत, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

६५ व्या वर्षी इंटिमेट सीन्सप्रियंकाने अन्नू कपूरसोबत इंटिमेट सीन्स करायला नकार दिला. पण पुढे वयाच्या ६५ व्या वर्षी एका सीरिजमध्ये अन्नू कपूर यांच्यावर कधी नव्हे इतके बोल्ड इंटिमेट सीन्स चित्रीत करण्यात आले. ऑल्ट बालाजीच्या पौरूषपूर सीरिजमध्ये त्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन्स दिलेत. अन्नू कपूरच्या या सीरिजने त्यावेळी धुमाकूळ घातला होता. सगळेच अन्नू कपूर यांचं बोल्ड रूप पाहून हैराण झाले होते.

टॅग्स :अन्नू कपूरप्रियंका चोप्राबॉलिवूड