Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special :कंगना रानौतची बहिण रंगोलीने बालपणीचा फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 10:43 IST

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा आज (23) वाढदिवस. यावर्षी ती ३२ वर्षांची झाली आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा आज (23) वाढदिवस. यावर्षी ती ३२ वर्षांची झाली आहे. यावर्षी कंगना 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटामुळे खुुप चर्चेत आली. या चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका केली होती आणि दिग्दर्शनदेखील तिने केले होते. या चित्रपटातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. कंगनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिची बहिण रंगोलीने कंगनाला तिच्या वाढदिवसासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

रंगोलीने ट्विटरवर कंगनाचा बालपणीचा निरागस फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने म्हटले की, 'माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव यू अ लॉट'

 

२३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात कंगना जन्मली. बालपणी कंगनाचा ग्लॅमर दुनियेशी कोणताच संबंध नव्हता. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून कंगनाने आपले शिक्षण पूर्ण केले.

या वाढदिवसाला स्वत:ला एक खास भेट देण्याचा निर्णय कंगनाने घेतला होता. ही भेट म्हणजे, दहा दिवसांचे मौनव्रत. कंगनाने स्वत: याचा खुलासा केला.मी कोईम्बतूर येथे एका खास मेडिटेशनसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. या ध्यान शिबिराला जायची माझी खूप दिवसांची इच्छा होती. पण नेहमी हा प्लान फिस्कटत होता. पण यावेळी माझ्या वाढदिवसाआधी मी हे ध्यान शिबीर पूर्ण करणार आहे. मौनव्रत ही मी स्वत:ला दिलेली खूप मोठी भेट असेल, असे कंगनाने सांगितले होते. 

‘मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटानंतर आता कंगना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल.

 

टॅग्स :कंगना राणौतरांगोळीमेंटल है क्यामाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी