Join us

कोट्याधीश करण जोहरने अंधेरीमध्ये भाड्याने घेतलं ऑफिस, दरमहा मोजावे लागणार 'इतके' लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:34 IST

करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनसाठी अंधेरीतील मोक्चाच्या ठिकाणी ऑफिस घेतलं आहे. या जागेचं महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

करण जोहरच्या (Karan Johar) मालकीच्या धर्मा प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड (Dharma Productions Pvt Ltd) या आघाडीच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीने मुंबईत एक नवीन ऑफिस भाड्याने घेतले आहे. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', आणि 'ऐ दिल है मुश्किल' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या प्रॉडक्शन हाऊसने अंधेरी भागात हे प्रशस्त ऑफिस घेतलं आहे. या जागेचं भाडं वाचून तुम्ही थक्कच व्हाल

किती आहे करण जोहरच्या ऑफिसचं भाडं

अमर उजालाने दिलेल्या रिपोर्टनुसार, धर्मा प्रॉडक्शन्सने हे ऑफिस गेल्या महिन्यात भाड्याने घेतलं आहे. मुंबईतील अंधेरी भागात हे ऑफिस असून या ऑफिसची जागा सुमारे ५,५०० चौरस फूट (5,500 sq ft) इतकी आहे. सध्या तरी करणने चार वर्षांसाठी या जागेचा करार केला आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात करणला १५ लाख रुपये भाडं भरावं लागणार आहे. दरवर्षी ५ % इतकी भाडेवाढ या जागेची होईल, असं सांगण्यात येत आहे.

या करारानुसार, धर्मा प्रॉडक्शन्स पुढील चार वर्षांमध्ये या जागेसाठी अंदाजे ७.७५ कोटी रुपये इतकं देणार आहे. भाड्यातील ५% वार्षिक वाढीमुळे, चौथ्या वर्षापर्यंत या जागेचं महिन्याचं भाडं १७.३६ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.

मोक्याच्या ठिकाणी ही जागामुंबईतील अंधेरी हा भाग रिअल इस्टेटसाठी एक प्रमुख बाजारपेठ मानला जातो. हा परिसर रस्ते, रेल्वे आणि मेट्रोने जोडलेला आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी जवळ असल्याने व्यावसायिकदृष्ट्या आणि राहण्यासाठी अशा दोन्ही दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे आहे. याच परिसरात अभिनेता कार्तिक आर्यन, अजय देवगण, अमिताभ बच्चन, सारा अली खान आणि मनोज वाजपेयी यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :करण जोहरबिग बॉस १९