Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:27 IST

. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या मंदिराच्या आवारातील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. त्याने बिग बॉस OTT 2 मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री केली आणि शोचा विजेता बनून इतिहास रचला. त्यानंतर एल्विश हे नाव घराघरात पोहोचले. नुकतेच एल्विशने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या मंदिराच्या आवारातील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एल्विशनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की एल्विश लाल रंगाच्या जॅकेटमध्ये वैष्णोदेवीच्या मंदिराबाहेर आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले, 'माता जिसको अपने घर बुलाये वो क़िस्मत वाले होते है'. एल्विशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी 'जय माता दी' अशा कमेंट केल्या आहेत.

एल्विश यादव हा एक फेमस यूट्यूबर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई एल्विश यादव हा करतो. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना एल्विश यादव हा दिसला. विशेष म्हणजे बिग बाॅसनंतर त्याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये देखील मोठी वाढ झालीये.

टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉससामाजिक