'बिग बॉस सीझन १९' चा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. फिनाले वीकमध्ये 'बिग बॉस'च्या घरात तणावाचे वातावरण आहे. एकमेंकाचे चांगले मित्र असलेले भारतीय क्रिकेट दिपक चहरची बहिण मालती चहर आणि मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे यांच्यात अचानक मोठे भांडण झालंय.
'बिग बॉस १९'चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. प्रोमोमध्ये गौरव खन्ना, मालती चहर आणि प्रणित मोरे हे किचनमध्ये असल्याचं दिसतंय. यावेळी थट्टेबाजीदरम्यान प्रणीतने प्रथम मालतीला ढकलले आणि "हिला घरी पाठवा" असे म्हणाला. यावर मालतीने त्याला परत ढकलले आणि विचारले, "तुझी मला हात लावण्याची हिंमत कशी झाली?" यानंतर प्रणीतने खेळकरपणे मालतीच्या दिशेनं लाथ केली. ही लाथ मालतीला लागली नाही. पण, प्रणितच्या या कृतीमुळं ती संतापली. मालतीचा पारा चढला आणि तिने प्रणीतला मूर्ख म्हटले, तसेच त्याला कोणतेही शिष्टाचार नसल्याचे सुनावले. यावर प्रणीतने म्हटले की, त्याने फक्त नाटक केले आणि तिला खरंच मारले नाही.
मालती चहर बाहेर, टॉप ५ निश्चित!या सगळ्या गोंधळादरम्यान, बिग बॉसच्या घरातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांकडून कमी मते मिळाल्यामुळे मालती चहरचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले असून, ती शोमधून बाहेर पडली आहे. 'बिग बॉस १९' ला त्याचे अंतिम टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत, ज्यात गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अमाल मलिक, तान्या मित्तल, प्रणीत मोरे यांचा समावेश आहे.