Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरात स्वयंपाकासंदर्भात नवीन नियमांची घोषणा; आता होणार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 17:47 IST

बिग बॉसच्या घरात नवीन नियमांची घोषणा करण्यात आली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. या शोच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. शो सुरू होऊन केवळ दीड आठवडा झाला आहे. पण त्याला जबरदस्त टीआरपी मिळत आहे. अलीकडेच निर्मात्यांनी शोचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्वयंपाक करण्यावरून आपापसात भांडताना दिसत आहेत. 

बिग बॉसच्या घरात नवीन नियमांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, घरात राहणारे सर्व सदस्य आपल्या घरातल्या लोकांसाठी जेवण बनवतील.  स्वयंपाकघर यापुढे 24 तास खुले राहणार नाही. नवीन नियमांची घोषणा होताच स्पर्धकांनी स्वयंपाकघराकडे धाव घेतली. यावेळी खानजादी आणि मन्नारा यांच्यात भांडण झालं. 

यंदाच्या 'बिग बॉस'मध्ये एक नव्हे तर तीन घरांमध्ये सदस्यांची विभागणी केली गेली. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'मधील सदस्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस १७ मध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्य, अनुराग ढोबाल, जिग्ना वोरा, मुनव्वर फारुकी, फिरोजा खान उर्फ खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना रईस खान आणि सोनिया बन्सल यांचा समावेश आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजन